GST relief for common people : देशातील सर्वसामान्य जनतेला मोठी दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल होण्याची शक्यात आहे. ज्याचे संकेत स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी जीएसटी दरांमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता वर्तवली आहे.
एका वृत्तपत्रात आलेल्या रिपोर्टनुसार, अर्थमंत्र्यांच्या मते रेव्हेन्यू न्यूट्रल रेट जो २०१७मध्ये १५.८ टक्के होता. २०२३मध्ये घटून ११.४ टक्के राहिला होता. तो आणखी कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. जीएसटी(GST) परिषद कर दरांना सुव्यवस्थित करणे आणि उद्योगाशी निगडीत समस्या सोडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या जवळपास आहे.
निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, मंत्री गटाने या विषयावर चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांनी स्वत: जीएसटी काउन्सीलमध्ये सादर करण्याआधी त्यांच्या शिफारशींची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा उद्देश कर संरचणेला सोपे बनवणे आणि उद्योग जगतामधील गरजांवर तोडगा काढणे आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आपली भागीदारी कमी करण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणुकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी काम करत आहे. त्यांनी हेही सांगितले की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे नॉन-बँकींग फायनान्स कंपन्या आणि मायक्रो क्रेडीट सेक्टरमध्येही स्थितीत सुधारणा झाली आहे.
निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी भारताच्या जलदगतीने वाढत्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत म्हटले की, २०२१नंतर भारत जगातील सर्वात जलदगतीने उदयास येत असलेली प्रमुख अर्थव्यवस्था बनलेला आहे. याशिवाय भारत- अमेरिका व्यापार कराराबाबतही चर्चा केली आणि सांगितले की दोन्ही देशांचे उद्दिष्ट परस्पर फायदेशीर करार करणे आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.