
Modi at Sufi event : सूफी संगीत समारंभ ‘जहना-ए-खुसरो’ 25व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या कार्यक्रमाचे आयोजन देशाची राजधानी दिल्लीतील सुंदर नर्सरीमध्ये केले गेले होते.
पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल एक्सवर कार्यक्रमाची एक क्लिप शेअर करत लिहिलि की, ‘’इस अंजुमन में आपको आना है बार-बार, अब नफरतों को दिल से निकाल दीजिए’’
या कार्यक्रमात आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी(PM Modi) म्हटले की, आज जहान-ए-खुसरो मध्ये येवून मन आनंदी होणे स्वाभाविकच आहे. जहान-ए-खुसरोच्या आयोजनात वेगळाच सुगंध असतो. हा सुगंध हिंदुस्थानच्या मातीचा आहे. त्या हिंदुस्थानाची तुलना हजर अमीर खुसरो यांनी जन्नतशी केली होती. आपला हिंदुस्तान जन्नतमधील तो बगीचा आहे, जिथे संस्कृतीचा हिरवा रंग बहरला आहे.
तसेच, सूफी परंपरेने माणसांमधील केवळ आध्यात्मिक अंतरचकमी केले नाही, तर सांसारिक अंतरही कमी केलं आहे. रूमी म्हणाले होते, शब्दांना उंची द्या, आवाजाला नको. कारण फूलं वादळत नाही, तर पावसात येतात.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.