
BJP Politics : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. ‘ये मोदीका वादा है’, असे म्हणत पंतप्रधानांकडून आपण दिलेले आश्वासन वेळेतच पूर्ण करणार, असा विश्वास जनतेला देण्यात आला होता. पण एक आश्वासन त्यांच्या दिल्लीतील सरकारला पूर्ण करता आले नाही.
दिल्लीत भाजपला 27 वर्षानंतर सत्ता मिळाली. त्यासाठी प्रचारादरम्यान भाजपसह पंतप्रधान मोदींकडून अनेक आश्वासने देण्यात आली, घोषणा करण्यात आल्या. ही आश्वासने आपले सरकार पूर्ण करणारच, असा विश्वास देण्यात आला होता. त्यानंतर भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आणि पक्षाच्या नेत्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री बनल्या.
रेखा गुप्ता यांना निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करता आले नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. राज्यात महिलांना महिला दिनापूर्वीच 2500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात होतील, असे आश्वासन पंतप्रधानांनी प्रचारादरम्यान दिले होते. इतर नेत्यांकडूनही प्रचारात असेच सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात या आश्वासनाची पुर्तता झालेली नाही.
दिल्ली सरकारकडून महिला दिनी केवळ एक समिती स्थापन करण्यात आली. तसेच या योजनेच फायदा केवळ गरीब महिलांनाच मिळणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. ही समिती आता योजनेचे निकष ठरवेल, त्यानंतर संबंधित महिलांकडून अर्ज भरून घेतले जातील, त्याची छाननी आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
योजनेची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. पण त्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही. यावरून आता राजकारण तापले आहे. दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या व माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी सरकारवर सडकून टीका केली.
आतिशी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील महिलांना 8 मार्चपर्यंत पहिला हप्ता मिळेल, असे आश्वासन दिले होते. पैसे तर सोडाच पण त्यांनी योजनेचे निकषही जाहीर केले नाहीत. नोंदणी कधी होणार, याचाही निर्णय घेतला नाही. त्यांनी काल चार जणांची समिती स्थापन केले. याचाच अर्थ मोदींची गॅरंटी जुमला ठरली आहे, असा निशाणा आतिशी यांनी साधला.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.