Gujarat News : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने (Congress News) नाकारले होते. त्यानंतर देशभरातील आणि प्रामुख्याने गुजरातमधील पक्षाचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. हे निमंत्रण नाकारणं पक्षाला चांगलंच महागात पडत असून, गुजरातमधील नेत्यांचे राजीनामासत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष अंबरीश डेर (Ambarish Der) यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. हे दोघेही भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला हा मोठा झटका बसला आहे. डेर यांच्या घोषणेआधीच त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याला न जाण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे आपण काँग्रेस सोडल्याचे डेर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. आता माझी घरवापसी होणार आहे. काही वर्षांपूर्वी आपण भाजपमध्ये होतो. आता पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला पक्षातून कधी निलंबित केले माहिती नाही, पण मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोढवाडिया यांनीही राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली. त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, प्रभू राम हे हिंदूसाठी केवळ पूजनीय नाहीत तर ते संपूर्ण भारताची आस्था आहेत. प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने देशवासीयांच्या भावना दुखावल्या.
लोकांच्या भावना समजून घेण्यात पक्ष म्हणून काँग्रेसला अपयश आले. सोहळ्यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठ राहुल गांधी यांनी आसाममध्ये गोंधळ निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि देशवासीयांनी संताप व्यक्त केला, अशी टीकाही मोढवाडिया यांनी केली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.