Telangana News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) आज तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान रेड्डी यांच्यासह काँग्रेसकडून मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज रेड्डी यांनी पंतप्रधानांचा उल्लेख ‘बिग ब्रदर’ असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने (Congress Government) केंद्र सरकारकडून राज्याला निधी दिला जात नसल्याचा आरोप केला होता. दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, आमदारांनी आंदोलनही केले. देशभरात या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसचीच सत्ता असलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना बिग ब्रदर म्हणताना गुजरात मॉडेलवरही (Gujarat Model) शिक्कामोर्तब केले आहे.
विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी रेड्डी (Revanth Reddy) म्हणाले, पंतप्रधान म्हणजे आमच्यासाठी ‘बिग ब्रदर’ आहेत. त्यांची मदत मिळाली तर सर्व राज्ये प्रगती करू शकतात, विकास करू शकतात. तेलंगणाला (Telangana) गुजरातसारखे पुढे जायचे असेल तर आपली मदत आवश्यक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हैद्राबाद हे देशातील महानगरांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हीही मदत करू. देशाच्या विकासाठी हैद्राबाद आणि तेलंगणा केंद्र सरकारच्या हातात हात घालून काम करेल. त्यासाठी आपल्याकडूनही मदत मिळावी, अशी अपेक्षा रेड्डी यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर आज पंतप्रधानांनी तेलंगणामध्ये तब्बल 56 हजार कोटींच्या 30 हून अधिक विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी अब की बार 400 पारचा नारा दिला. त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. संपूर्ण देश आपला परिवार असल्याचे सांगत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदींना कुटुंब नसल्याचे विधान यादव यांनी काल केले होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.