Supreme Court News : सुप्रीम कोर्टाकडून ‘आप’ला झटका; निवडणुकीच्या तोंडावर कार्यालय सोडण्याचे आदेश

AAP office Issue : आपचे कार्यालय कोर्टासाठी आरक्षित केलेल्या जागेवर असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला.
AAP Office, Supreme Court
AAP Office, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court News) सोमवारी झटका दिला. पक्षाचे दिल्लीतील कार्यालय रिकामे करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र, कोर्टाकडून पक्षाला काहीसा दिलासाही मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे कार्यालय रिकामे करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत दिली आहे. हे कार्यालय कोर्टासाठी आरक्षित जागेवर असल्याची तक्रार करण्यात आली होती.

आपचे (AAP) कार्यालय दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात आले आहे. याबाबत दिल्ली हायकोर्टानेही (Delhi High Court) तीव्र नाराजी व्यक्त करत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात आपकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. पण तिथेही आपला धक्का बसला आहे. नवीन कार्यालयासाठी आपने सरकारकडे अर्ज करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे.

AAP Office, Supreme Court
Lok Sabha Election 2024 : ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’ची लाट; गडकरी, फडणवीसांसह अनेकांची साथ...

कोर्टाने म्हटले की, आप नवीन कार्यालयाच्या जागेसाठी सरकारकडे अर्ज करू शकते. या अर्जावर संबंधित विभागाने चार आठवड्यात निर्णय घ्यावा. सध्याचे कार्यालय आधापीसून कोर्टासाठी आरक्षित जागेवर आहे. या जमिनीवर हायकोर्टातील कर्मचाऱ्यांसाठी रहिवासी इमारत बांधली जाणार आहे. तिथे पक्षाच्या कार्यालयाला परवानगी दिली जाऊ शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाला भ्रमित केले

सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळीची आपच्या कार्यालयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कुणालाही कायदा तोडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे जमीन सोडून दिल्ली हायकोर्टाला सोपवावी, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी म्हटले होते.

आपकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली होती की, आम्ही सुप्रीम कोर्टात योग्य कागदपत्रे सादर करू. या प्रकरणात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला भ्रमित करत आहे. ही जागा दिल्ली सरकारने आपला दिली आहे. त्यावर कोणतेही अतिक्रमण झालेले नाही, असे आपकडून स्पष्ट करण्यात आले होते.

आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर आपला नव्या कार्यालयासाठी जागा शोधावू लागणार आहे. निवडणुकीची रणनीती नवीन कार्यालयातून ठरवावी लागेल. आधीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातत्याने नोटीस पाठवलेली जात असल्याने त्यांना अटक होण्याची भीती नेत्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. त्यातच कार्यालयही हातातून निसटले आहे.

AAP Office, Supreme Court
Lok Sabha Election 2024 : अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com