Rahul Gandhi Sarkarnama
देश

गुजरात नशेचे केंद्र, अमली पदार्थांवर कारवाई नाही : राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : "काँग्रेसची सत्ता येताच 1000 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार."

सरकारनामा ब्यूरो

गुजरात : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (५ सप्टेंबर) गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले, त्यांच्या विरोधात कामे केली जात आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजपवर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते म्हणाले, गुजरात राज्य हे नशेचं सेंटर बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते, ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांची परवानगी घ्यावी का?

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. याशिवाय 3000 इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणाही काँग्रेस नेत्याने केली. काँग्रेसची सत्ता येताच 1000 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT