Israel-Hamas War Sarkarnama
देश

Israel-Hamas War : इस्त्रायलवर हमासचा पुन्हा एकदा मोठा हल्ला; तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र डागले!

Mayur Ratnaparkhe

Israel Vs Hamas News : हमासने इस्त्रायलवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. हमासची सशस्त्र तुकडी अल-कस्साम ब्रिगेडने म्हटले आहे की, त्यांनी रविवारी तेल अवीववर क्षेपणास्त्र डागून मोठा हल्ला केला. या दरम्यान इस्त्रायली सैन्याने क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा देत संपूर्ण तेल अवीवमध्ये सायरन वाजवले. जेणेकरून लोकांना हल्ल्यापासून वाचवण्यासाठी अलर्ट करता येईल.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, रविवारी आपल्या टेलीग्राम चॅनलवर हमासची सशस्त्र शाखा अल-कस्साम ब्रिगेडने दावा केला आहे की, इस्त्रायली हल्ल्यामुळे झालेल्या नरसंहारास प्रत्युत्तर म्हणून हा क्षेपणास्त्र हल्ला केला गेला होता. तर हमास(Hamas) अल-अक्सा टीव्हीने म्हटले की, क्षेपणास्त्र गाजा पट्टीतून डागण्यात आले आहेत. मागील चार महिन्यांपासून तेल अवीवमध्ये रॉकेट सायरन वाजवला गेला नव्हता. खरंतर इस्त्रायली सैन्याने सायरन वाजवण्याचे कारण तत्काळ सांगितले नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इस्त्रायली(Israel) आपत्कालीन वैद्यकीय सेवांनी म्हटले की, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती नाही. या हल्ल्यातून हे सिद्ध होते की, इस्लामवादी गट मागील सात महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून हवाई आणि जमिनीस्तरावरील इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यानंतरही आताही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहेत.

हमासने मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर हल्ला करून युद्धाला तोंड फोडले होते. ज्यामध्ये फिलिस्तीनी उग्रवाद्यांनी जवळपास 1200 लोकांना ठार केलं होतं. ज्यात बहुतांश सामान्य नागरिक होते आणि जवळपास 250 जणांना बंधक बनवून नेलं होतं. इस्त्रायलच्या प्रत्युत्तरातील हल्ल्यामध्ये गाजात किमीत कमी 35 हजारांहून अधिक जण मारले गेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT