Kapil Sibal Press News : राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी रविवारी पत्रकारपरिषद घेत, पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'हेलिकॉप्टरच्या फेऱ्या संपल्यानंतर राजद नेते तेजस्वी यादव यांचा तुरुंगाकडे जाण्याचा प्रवास सुरु होईल.' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत तपास संस्था मोदींच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला आहे.
सिब्बिल(Kapil Sibal) म्हणाले, 'मोदी यांचे जाहीर सभेतले विधान पाहिले तर तपास संस्थांचा ते दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे, मात्र निवडणूक आयोग कारवाई करेल, अशी अपेक्षा नाही.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय 'विरोधी पक्ष मतांसाठी मुजरा करत असल्याचे मोदी(PM Modi) यांनी म्हटले होते, त्यांचे हे वक्तव्य सुध्दा आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पंतप्रधान मोदी ज्या पदावर बसले आहेत ते पद प्रतिष्ठेचे आहे. वादग्रस्त विधाने करुन मोदी हे पदाची प्रतिष्ठा कमी करीत आहेत. त्यांनी जो मुजरा शब्द वापरला आहे, त्यामुळे महिलांचा अपमान झाला आहे.' असा आरोपही सिब्बल यांनी केला आहे.
'तिरस्काराची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे काय? हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे. अशा प्रकारे विकसित भारत कसा काय तयार होईल? या सर्व प्रकरणांत निवडणूक आयोग काही करणार नाही, याची आापणास कल्पना आहे.', अशी पुष्टीही सिब्बल यांनी जोडली.
याचबरोबर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, खूप लोक म्हणत आहेत की या यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते. यामुळे आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की छेडछेडीची कोणतीही शक्यता नसावी.
कपिल सिब्बल म्हणाले, की आम्ही हेही म्हणत नाही की छेडछाड केली गेली आहे आणि हेही की छेडछाड झालेली नाही. त्यांनी म्हटले कोणत्याही यंत्राशी छेडछाड केली जाऊ शकते. आम्हाला विश्वास आहे, परंतु मतदारांसाठी हे सुनिश्चित केले गेले पाहिजे की त्यांचे मत त्याच उमेदवारास गेले आहे, ज्यास त्याने मतदान केले आहे. जर मतांची संख्या आणि वेळेमध्ये फरक असेल तर तुम्हाला माहिती होईल. मी ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांसाठी हा चार्ट बनवला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.