Owaisi Vs Modi : 'आता तो दिवस दूर नाही, जेव्हा मोदी म्हणतील..' ; ओवैसींनी बिहारमधून साधला निशाणा!

Asaduddin Owaisi Rally in bihar : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत? ; बिहारमध्येही मुस्लीम मुख्यमंत्री होवू शकतो, असंही म्हणाले आहेत.
Owaisi Vs Modi
Owaisi Vs ModiSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा बाकी आहे, यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तत्पुर्वी एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये आपली सर्व ताकद लावली आहे. येथील पालीगंजमध्ये एका प्रचारसभेतून बोलताना ओवैसींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

ओवैसी(Asaduddin Owaisi) म्हणाले, '2014मध्ये जेव्हा मोदी आले होते तेव्हा म्हणाले होते की 'अच्छे दिन' आणेल, सर्वांच्या बँक खात्यात 15 लाख येतील आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार देईन. यानंतर जेव्हा 2019 सुरू झाले तेव्हा मोदी म्हणाले की मी तुमचा चौकीदार आहे. त्यानंतर जेव्हा निवडणूक झाली तेव्हा म्हणाले की मी तुमचा सेवक आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Owaisi Vs Modi
Kapil Sibal News : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कपिल सिब्बलांचं 'EVM'बाबत मोठं विधान, म्हणाले...

'आता 2024 आले आहे तर म्हणत आहेत की मी बायोलॉजिकली जन्मलेलो नाही. शिवाय मोदी(PM Modi) म्हणतात की मला शक्तीने एका उद्दिष्टासाठी जन्माला घातलं आहे. त्यामुळे आता दिवस दूर नाही जेव्हा मोदी म्हणतील मीच सर्वकाही आहे, माझीच पूजा करा.' अशा शब्दांमध्ये ओवैसींनी टीका केली.

ओवैसींनी काराकाट लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ओवैसींनी म्हटलं की करोना महामारी दरम्यान आमचे कामगार बंधू-भगिनी खूप दूरवरून चालत घरी पोहचले. यासाठी तुम्हाला देवाने जन्माला घातलं का?, जो कोणी पंतप्रधान बनेल त्याने देशावर काही उपकार केले नाही आणि आज मोदी भ्रमात आहेत. मोदी आज देशावर काही उपकार करत नाहीत, उलट देशानेच तुम्हाला पंतप्रधान बनवून तुमच्यावर उपकार केले आहेत.

Owaisi Vs Modi
Amit Shaha News : भाजप सत्तेत आल्यास 'एक देश एक निवडणूक', तर 'या' कायद्याचीही अंमलबजावणी करणार; शहांचं आश्वासन

काराकाटमध्ये प्रचारसभेत बोलताना ओवैसींनी असंही म्हटलं की, बिहारच्या मुस्लिमांनी हे लक्षात ठेवायला हवं, की ते केवळ मतदानच करू शकत नाही, तर पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही हे दाखवून देऊ की बिहारमध्ये(Bihar) एक मुस्लीम मुख्यमंत्रीही होवू शकतो. बिहारच्या काराकाटमध्ये कालीन विणली जाते, मात्र त्या लोकांसाठी ही पसरवत राहायची नाही, जे सत्तेसाठी तुमचा वापर करू इच्छित आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com