Dhananjay Chandrachud Sarkarnama
देश

Ex CJI Dhananjay Chandrachud : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा निवृतीच्या दिवशीचा ‘तो’ आदेश चर्चेत; ऐतिहासिक निकालानंतर झाली आठवण...

Harish Rana euthanasia case : सीजेआय चंद्रचूड यांनी उत्तर प्रदेश सरकारला हरीशच्या उपचाराचा खर्च करण्याचे आदेश दिले होते.

Rajanand More

Supreme court euthanasia order India : सुप्रीम कोर्टाने बुधवारी ऐतिहासिक निकाल देताना हरीश राणा या तरूणाला इच्छामरणाची परवानगी दिली. हरीश मागील १३ वर्षांपासून कोमात आहे. आई-वडिलांनी त्याला इच्छामरण देण्याची विनंती करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. ही याचिकेला कोर्टाने मंजुरी दिली आहे. या निकालानंतर हरीशच्या वडिलांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले.

हरीशवर घरीच १३ वर्षांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कसलीही चिन्हे नाहीत, असा अहवाल एम्सने दिला होता. त्याआधारे आज कोर्टाने निकाल दिल्यानंतर हरीशचे वडील अशोक राणा भावुक झाले. यावेळी त्यांना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचीही आठवण झाली. एक वडील म्हणून माझ्यासाठी हे खूप कठीण आहे. पण सध्या ज्या लोकांची माझ्या मुलासारखी अवस्था आहे, त्यांनाही या निकालाने दिलासा मिळेल, याचा आनंद असल्याचे राणा म्हणाले.

राणा यांनी सांगितले की, ‘तत्कालीन सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आम्हाला त्यावेळी फिजिओथेरपीसोबतच एका नर्सची सुविधा उपलब्ध करून दिली होती. माझा लहान मुलगा हरीशची सेवा करत होतो. आम्ही लोक दररोज फिजिओथेरपी करत होतो.’ माजी CJI चंद्रचूड यांनी निवृत्तीच्या दिवशी हरीशसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्याचीच आठवण राणा यांनी सांगितले.

सीजेआय चंद्रचूड यांनी उत्तर प्रदेश सरकारला हरीशच्या उपचाराचा खर्च करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने त्यावेळी हरीशच्या घरीच त्याच्या देखभालीची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले होते. एक फिजियोथेरेपिस्ट आणि आहार विशेषज्ञ नियमित भेट दिईल. तसेच नर्सिंग सुविधा आणि फोनवरून एक वैद्यकीय अधिकारी मदत करेल, असेही सरकारने म्हटले होते. त्यामुळे राणा कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला होता.

कोर्टाच्या आदेशानंतर पुढे काय?

आज सुप्रीम कोर्टाने इच्छामरणाची विनंती मान्य केल्यानंतर आता हरीशचा फूड पाईप काढला जाईल. त्याला फूड पाईपमधूनच जेवण दिले जात होते. त्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल केले जाईल. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इतर लाईफ सपोर्टही थांबविला जाईल. हरीशच्या मृत्यूनंतर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT