Supreme Court : सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक निकाल देताना न्यायमुर्तींच्या डोळ्यात आले पाणी; देशात पहिल्यांदाच आला असा निकाल...

Passive euthanasia india : हरीश हा १३ वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शिक्षणासाठी चंदीगढ येथे हॉस्टेलमध्ये राहत होता. तो या हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती.
Harish Rana case supreme court
Harish Rana case supreme courtSarkarnama
Published on
Updated on

Supreme court end of life ruling : मागील काही वर्षांपासून इच्छामरणाच्या कायदेशीर मान्यतेवर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टातही त्यावर बराच खल झाला होता. पण आतापर्यंत एकदाही कोर्टाने इच्छामरणाला परवानगी दिली नव्हती. आज कोर्टाने याबाबत ऐतिहासिक निकाल दिला. मागील १३ वर्षांपासून कोमात असलेल्या एका ३२ वर्षीय तरूणाच्या पालकांनी इच्छामरणासाठी (Passive euthanasia) केलेली याचिका कोर्टाने मान्य केली आहे.

हरीश राणा असे या तरूणाचे नाही. १३ वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये हरीशच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमामध्ये आहे. हरीशच्या आई-वडिलांनी मुलाच्या इच्छामरणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल देत इच्छामरणाला परवानगी दिली.

निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक झाले होते. पारदीवाला यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्ये इच्छामरणाच्या कायदेशीर बाबींबात निकाल दिला होता. निकालावेळी कोर्टाने Passive euthanasia (लाईफ सपोर्ट हटविणे) आणि Active euthanasia (औषध देऊन मृत्यू) मधील फरकही स्पष्ट केला. अँक्टिव्ह यूथेनेशियाला भारतात बेकायदेशीर मानले जाते. कोर्टाने म्हटले की, एखादा रुग्ण पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असेल तर त्याचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवा.

Harish Rana case supreme court
Priyanka Gandhi news : राहुल गांधींची ती मिठी अन्..! मोदींच्या मंत्र्यांनी लोकसभेत बहिणीसमोरच उडवली खिल्ली; प्रियांका गांधींचा करारा जवाब

मागील १३ वर्षांपासून हरीश राणाला जीवरक्षक उपचार सुरू होते. मात्र, एम्सने तो कधीच बरा होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट केले होते. कोर्टानेच याबाबत एम्सकडे अहवाल मागविला होता. या अहवालाच्य आधारे कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल देत हरीश राणाचा लाईफ सपोर्ट हटविण्यास परवानगी दिली. निकाल देण्याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हरीशच्या आई-वडिलांशी संवाद साधला होता. कोर्टाने कुटुंबियांकडून हरीशसाठी इतकी वर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल होती.

Harish Rana case supreme court
मुख्यमंत्र्यांचे लाडके डॅशिंग IPS अधिकारी अडकणार विवाह बंधनात; देशभरात का होतेय चर्चा?

कोर्टाने आज निकाल देताना लाईफ सपोर्ट सिस्टीम काढताना सन्मानपूर्वक काढली जावे, असे भावनिक होत सांगितले. सध्या हरीशवर घरीच उपचार सुरू आहे. आता त्याला एम्समध्ये हलविण्याचे आदेश कोर्टाने दिले. दरम्यान, हरीश हा १३ वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शिक्षणासाठी चंदीगढ येथे हॉस्टेलमध्ये राहत होता. तो या हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com