Shiromani Akali Dal MP Harsimrat Kaur Badal expressed gratitude to Maharashtra Police Inspector Santosh Vaijnath Kendre for his courageous intervention during the attack on her husband, Sukhbir Singh Badal, in Nanded. Sarkarnama
देश

Nanded attack update : सुखबीर सिंग बादल यांचा वाचविला जीव, पोलीस निरीक्षक संतोष केंद्रेंच्या शौर्यासमोर नेत्याची खासदार पत्नी नतमस्तक

Harsimrat Kaur Badal: सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी संतोष केंद्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Rajanand More

Maharashtra Police news : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरूवारी नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे बादल हे या हल्ल्यातील थोडक्यात बचावले. केंद्रे यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरु माता साहेब गुरुद्वारात हल्ला झाला आहे. प्रार्थना करून पायऱ्या उतरत असतानाच सेवादार जसपाल सिंग याने हल्ला धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण पथकातील पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे बादल यांच्या सुरक्षेसाठी तिथेच उपस्थित होते. हल्ला होत असल्याचे पाहताच त्यांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला.

हल्ल्यामध्ये बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर संतोष केंद्रे हेही हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातालाही दुखापत झाली असून दोघांवरील नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपीला घटनास्थळीत ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या खासदार पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत प्रकृतीची विचारपूस केली.

केंद्रे यांच्या शौर्याला सलाम

सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी संतोष केंद्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, सुखबीर सिंह बादलजी यांचे प्राण वाचवण्यासाठी शौर्य दाखविलले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांना मी सलाम करते. सुखबीरजी आणि हल्लेखोर यांच्यामध्ये ते मानवी ढाल बनून उभे राहिले.

सुखबीरजींचे संरक्षण करण्यासाठी संतोष केंद्रे यांनी जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी या कृतीतून स्वतःपेक्षा कर्तव्याला आणि भीतीपेक्षा धैर्याला प्राधान्य देणे, हा वर्दी परिधान करण्याचा खरा अर्थ पुन्हा एकदा पटवून दिला. बादल कुटुंब या शौर्यासाठी कृतज्ञ असून तुमच्यासमोर नतमस्तक होत असल्याची भावना हरसिमरत कौर यांनी व्यक्त केली आहे. तुमचे शौर्य कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT