Rahul Bansal: 500 रुपयांची लाच न देण्याचा सल्ला देणारे IPS राहुल बन्सल 1 कोटींच्या लाच प्रकरणात अडचणीत; व्हिडिओ व्हायरल

IPS Rahul Bansal Bribe Case:IPS राहुल बन्सल यांच्यावर सायबर फसवणुकीचे प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटींची लाच मागितल्याचा आरोप; दिल्ली CBI न्यायालयात तक्रार दाखल.
IPS Rahul Bansal Bribe Case
IPS Rahul Bansal Bribe CaseSarkarnama
Published on
Updated on
  1. IPS राहुल बन्सल यांच्यावर १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप.

  2. सायबर फसवणुकीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी लाच मागितल्याचा दावा.

  3. दिल्लीतील विशेष CBI न्यायालयात तक्रार दाखल.

नवी दिल्ली: नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना भ्रष्टाचार आणि लाचखोरीविरोधात भूमिका मांडणारे छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी राहुल बन्सल सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. सायबर फसवणुकीचे एक प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधितांकडून तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी दिल्लीतील विशेष CBI न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना दिलेल्या एका मुलाखतीत राहुल बन्सल यांनी भ्रष्टाचाराच्या अनुभवाबद्दल भाष्य केले होते. आपल्या भावाच्या जन्म दाखल्यासाठी एका पंचायत अधिकाऱ्याने ५०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रसंग त्यांनी या मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी केवळ ५०० रुपये देतानाही आपल्याला अत्यंत वाईट वाटल्याचे त्यांनी म्हटले होते.

मूळचे राजस्थानातील असलेले आयपीएस राहुल बन्सल यांच्यावर सायबर फसवणुकीच्या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जुना मुलाखतीचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

मुलाखतीतील ‘तो’ प्रसंग पुन्हा चर्चेत

राहुल बन्सल नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असतानाचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते देशातील भ्रष्टाचार, प्रशासनातील त्रुटी आणि पोलिस व्यवस्थेतील सुधारणांबाबत आपली मते मांडताना दिसतात.

या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावासोबत घडलेला एक अनुभवही सांगितला होता. त्यांचा भाऊ आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेत असताना एका संशोधन पेपरच्या सादरीकरणासाठी अमेरिकेत जाणार होता. त्यासाठी तातडीने जन्म दाखल्याची आवश्यकता होती. जन्म दाखला वेळेत मिळवून देण्यासाठी एका पंचायत अधिकाऱ्याने ५०० रुपयांची लाच मागितल्याचे बन्सल यांनी सांगितले होते.

त्या वेळी ५०० रुपये लाच म्हणून द्यावे लागल्याने आपल्याला अत्यंत वाईट वाटल्याचे त्यांनी मुलाखतीत नमूद केले होते. याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून, त्यांच्यावर झालेल्या १ कोटी रुपयांच्या लाच मागणीच्या आरोपाशी हा जुना व्हिडीओ जोडला जात आहे.

IPS Rahul Bansal Bribe Case
Abdul Sattar: मॅडमची बदली नको! विद्यार्थ्यांचा टाहो; भुसेंच्या भेटीसाठी सत्तारांनी मुंबई गाठली, शिक्षिकेची पुन्हा त्याच शाळेत प्रतिनियुक्ती

सायबर फसवणुकीचे प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

राहुल बन्सल हे २०२२ च्या तुकडीतील छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांच्यावर सायबर फसवणुकीशी संबंधित एका प्रकरणात मोठी रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित सायबर फसवणुकीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी तसेच आरोपींवर कारवाई होऊ नये यासाठी १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात राहुल बन्सल यांच्यासह सहायक उपनिरीक्षक प्रवीण कुमार राठोड आणि कॉन्स्टेबल अंशुल शर्मा यांचीही नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.

IPS Rahul Bansal Bribe Case
TET News: मदरसा असो वा वैदिक पाठशाळा; टीईटी बंधनकारक होणार? अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका

५०-५० लाखांच्या दोन हप्त्यांत रक्कम घेतल्याचा दावा

दिल्लीतील विशेष CBI न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, १ कोटी रुपयांची कथित लाच एकाच वेळी स्वीकारण्यात आली नाही. मे २०२६मध्ये ही रक्कम ५०-५० लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये देण्यात आल्याचा तक्रारदाराचा दावा आहे.

ही रक्कम एका मध्यस्थामार्फत स्वीकारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील कथित आर्थिक व्यवहार आणि त्यामागील भूमिकेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हॉट्सॲप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगचे डिजिटल पुरावे

तक्रारदाराने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ काही डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये कथित आर्थिक व्यवहाराशी संबंधित व्हॉट्सॲप चॅट्स तसेच कॉल रेकॉर्डिंग्जचा समावेश आहे.

या डिजिटल पुराव्यांच्या आधारे तक्रारदाराने १ कोटी रुपयांच्या कथित लाच व्यवहाराचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील न्यायालयीन प्रक्रियेत या पुराव्यांची सत्यता आणि त्यातील मजकुराचे महत्त्व काय ठरते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राहुल बन्सल यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे सध्या तक्रारीतील दावे आहेत. या आरोपांची न्यायालयीन प्रक्रियेत पडताळणी होणे बाकी आहे. त्यामुळे आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी ठरवता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com