Narendra Modi Sarkarnama
देश

Haryana Election : उमेदवारीवरून भाजपमध्ये घमासान; आमदारानंतर तीन बड्या नेत्यांनी दिला झटका...

Haryana Assembly Election 2024 BJP Candidate : भाजपची पहिली यादी येऊन 24 तासही उलटत नाही तोच आणखी तीन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरु आहे.

Rashmi Mane

Harayana Latest News : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच पक्षात राजीनाम्याची लाटच सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच भाजपाला मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. भाजपची पहिली यादी येऊन 24 तासही उलटत नाही तोच आणखी तीन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरु आहे.

तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. या यादीत भाजपच्या (BJP) पाच बड्या नेत्यांचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. पहिल्या यादीत पक्षाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण तिकिट न मिळाल्याने भाजपचे निष्ठावंत दिग्गज नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीच सूर आहे.

तिकीट नाकारल्याने संतापलेले रतियाचे भाजप आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कर्णदेव कंबोज, रणजित सिंह चौटाला आणि कविता जैन यांनीही भाजपच्या (BJP) सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

रणजित चौटाला यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली

हरियाणाचे (Hariyana) कॅबिनेट मंत्री चौधरी रणजित सिंह चौटाला यांचेही नाव यादीतून गायब आहे. भाजपच्या पहिल्या यादीतून आपले नाव गायब झाल्याचे पाहून रणजितसिंह चौटाला यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली. या भेटीत चौटाला यांनी भविष्यातील योजनांवरही चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

पक्षातील इतर अनेक ज्येष्ठ नेते उमेदवारांच्या पहिल्या यादीवर खूष नसल्याचेही बोलले जात आहे. आता पहिली यादीत पक्षांतर्गत उमेदवारांची नावे निश्चित करताना पक्षाने दिग्गज नेत्यांना प्राधान्य दिलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजीनाम्याची लाट सुरू झाली आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

राजकारण्यांची तिकिटे कापण्यात आल्याने पदाधिकारी नाराज

भाजपच्या पहिल्या यादीतून अनेक मोठी नावे गायब आहेत. या यादीत माजी कॅबिनेट मंत्री कविता जैन यांना तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत अनेक नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

हरियाणातील उमेदवारांच्या यादीनंतर भाजपमध्ये भूकंप! 5 नेत्यांनी दिले राजीनामे

भाजपने इंद्री विधानसभेतून राम कुमार कश्यप यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे संतप्त होऊन हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी राजीनामा दिला आहे. तसेच आमदार लक्ष्मण नापा यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. बावनी खेडा विधानसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त करत सुखविंदर शेओरान यांनी किसान मोर्चाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.

उकलाना विधानसभा मतदारसंघातून तिकीट वाटप चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते समशेर गिल यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व जबाबदार्‍यांचा राजीनामा दिला आहे. तर सोनीपत विधानसभा मतदारसंघातून भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनी राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT