BJP Rahul gandhi and Jilebi Sarkarnama
देश

BJP sent jalebi for Rahul Gandhi : हरियाणा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी!

Haryana BJP And Rahul Gandhi : ऑनलाइन दिली ऑर्डर दिल्याचा स्क्रीनशॉर्टही एक्सवर पोस्ट केला आहे.

Mayur Ratnaparkhe

Haryana elections Result and jalebi : हरियाणाचा निवडणूक प्रचारापासून ते निकाला लागल्यानंतरही जिलेबी प्रचंड चर्चेत आहे. निकालाच्या दिवशीतर दिवसभर सोशल मीडियावर हरियाणातील जिलेबीची आणि काँग्रेसच्या पराभवाचीच चर्चा होती. यात प्रामुख्याने राहुल गांधी हे निशाण्यावर होते. त्यानंतर आता निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपनेही राहुल गांधींना जिलेबी पाठवली आहे. ज्याची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.

हरियाणा भाजपने(BJP) ऑनलाइन ऑर्डर करून राहुल गांधींसाठी पक्ष मुख्यालयाच्या पत्त्यावर जिलेबी पाठवली आहे. एवढंच नाहीतर जिलेबीच्या ऑनलाइ ऑर्डरचा एक स्क्रीनशॉर्टही हरियाणा भाजपने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक किलो जिलेबीची ऑर्डर दिली गेल्याचे दिसत आहे. ही जिलबी AICC मुख्यालयाच्या पत्त्यावर २४ अकबर रोडवर पाठवली गेली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्यावेळी राहुल गांधींनी(Rahul Gandhi) गोहानामध्ये एका निवडणूक रॅली दरम्यान एका स्थानिक हलवाईद्वारे बनवल्या गेलेल्या जिलबींची स्तुती केली होती. त्यांनी म्हटले होते की मातूराम हलवाई यांनी बनवलेली जिलबी संपूर्ण देशात विक्री करण्यायोग्य आहे आणि ती निर्यातही केली जाऊ शकते.

प्रचार रॅलीती भाषणात राहुल गांधींनी या जिलबीचा उल्लेख करत सांगितले होते की, कारमध्ये प्रसिद्ध मातूराम हलवाई यांच्या जिलबी चव घेतली आणि प्रियंका गांधी यांना मेसेज पाठवला की, आज मी माझ्या जीवनातील सर्वाता चांगील जिलबी खाल्ली आहे. तसेच त्यांनी पुढे हेदेखील म्हटले होते की, मी तुझ्यासाठी जिलबीचा एक डब्बा देखील आणत आहे.

रॅली दरम्यान राहुल गांधींनी म्हटले की, मी दीपेंद्र आणि बजरंग पुनिया यांना म्हटले की, ही जिलबी संपूर्ण जगात गेली पाहीजे. खरंतर तेव्हा राहुल गांधींच्या या विधानावर सर्वांनाच हसू आलं होतं, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जर एखाद्या कारखान्या मोठ्या प्रमाणात जिलबीचं उत्पादन केलं गेलं तर हा एक रोजगाराच स्त्रोत बनू शकतो. झालं यानंतर मग लोक राहुल गांधींची मजा घेऊ लागले. जे हरियाणातील निवडणूक कालावधीत दिसून आलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT