PM Modi on Haryana Election Result : हरियाणात भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Narendra Modi on Jammu-kashmir Election Result जम्मू-काश्मीरमधील निवडणूक निकालावरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Narendra Modi
Narendra Modi sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi Reaction on Haryana, Jammu-kashmir Election Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना, सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि हरियाणामधील जनतेचे विशेष आभार मानले. तसेच, या जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाईल, असंही मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) भाषणात म्हणाले, 'जहाँ दूध, घी का खाना वैसा है अपना हरियाणा..., हरियाणा के लोगो ने फिर कमाल कर दिया है और कमल, कमल कर दिया आहे. हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीतेच्या धरतीवर कमळ फुलंल आहे, विकासाचा विजय झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शांततापूर्ण निवडणूक झाली. मतमोजणी झाली, निकाल आला. हा भाजपच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे.

Narendra Modi
Haryana Election Result : हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसचा धुव्वा..; 'ही' आहेत महत्त्वाची 5 कारणं

तसेच 'जम्मू-काश्मीर(Jammu-kashmir)च्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्सला जास्त जागा दिल्या, मी त्यांनाही शुभेच्छा देतो. जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढवत होती, त्यापैकी भाजप मतांच्या टक्केवारीनुसार भाजप सर्वात मोठा ठरला आहे.' असंही मोदींनी सांगितलं.

Narendra Modi
Gohana ka Jaleba : हरियाणात विधानसभा निवडणूक निकालाच्या चढ-उतारात 'गोहाना का जलेबा' ट्रेंडिंगमध्ये!

याशिवाय 'मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विजयी उमेदवारांचे अभिनंद करतो आणि तेथील जनतेचेही अभिनंद करतो. तसेच सर्व भाजप(BJP) कार्यकर्त्यांना त्यांच्या कष्टासाठी नमन करतो. हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम आहे. हरियाणाचा हा विजय आमच्या नम्र विनम्र मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचा विजय आहे. हरियाणाच्या जनतने नवा इतिहास रचला आहे.' अशा शब्दांमध्य मोदींनी आनंद व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com