Rakesh Daulatabad Sarkarnama
देश

Rakesh Daulatabad : हरियाणातील अपक्ष आमदाराचे हृदयविकाराने निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक!

Haryana Independent MLA Rakesh Daulatabad : राकेश दौलताबाद यांच्या निधनावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

Mayur Ratnaparkhe

Haryana Political News : देशभरात आज(शनिवारी) एकीकडे लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे हरियणातून एक दु:खद घटना समोर आली आहे. येथील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचे निधन झाले आहे. ते गुरुग्रामच्या बादशाहपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेते पोहचले होते.

45 वर्षीय राकेश दौलताबाद(Rakesh Daulatabad) यांना आज(शनिवारी) सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यानंतर त्यांना पालम विहारच्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र उपचाराच्या काही वेळानंतरच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये दु:खाची लाट पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या निवडणुकीत बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते आणि त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. यानंतर त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिलं होतं. त्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार मनीष यादव यांचा पराभव केला होता. राकेश दौलताबाद यांची प्रतिमा एक समाजसेवी नेता म्हणून होती.

पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला शोक -

अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांच्या निधानावर पंतप्रधान मोदी(PM Modi) यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स हॅण्डलवर ट्वीट केले, हरियाणाचे आमदार राकेश दौलताबाद यांच्या अकस्मिक निधानाने अत्यंत दु:ख झाले आहे. आपले कष्ट आणि चिकाटीने त्यांनी अतिशय कमी वयात जनमाणसात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. दु:खाच्या याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना ईश्वर प्रदान करो, ओम शांती.''

राकेश दौलताबाद यांच्या निधनावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Naib Singh) यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, बादशाहपूरचे आमदार आणि विधानसभेतील प्रमुख सहकारी राकेश दौलताबाद यांच्या अकस्मिक निधनाच्या मोठ्या धक्क्याने मी स्तब्ध आहे. त्यांच्या अचानक जाण्याने हरियाणाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT