Arvind Kejriwal : भाजप अन् इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? अरविंद केजरीवालांनी थेट आकडाच सांगितला

INDIA Alliance Vs BJP : दिल्लीतील लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी एक दिवस आधीच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचा मोठा विजय होणार असल्याचे सांगितले. तर भाजप ४०० पासून खूप दूर असणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Arvind Kejriwal News : दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (ता. 26) मतदान होत आहे. तत्पुर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीवरून मोठी भविष्यवाणी केली आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप कमी तर इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील, असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी कुणाला किती जागा मिळतील, याचा थेट आकडाच सांगितल्याने देशभरातून आकडेमोड सुरू झाली आहे.

दिल्लीतील लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी एक दिवस आधीच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचा मोठा विजय होणार असल्याचे सांगितले. तर भाजप 400 पासून खूप दूर असणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागा मिळणेही मुश्किल आहे. तर इंडिया आघाडीला 300 हून अधिक जागा मिळतील. तसेच दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार जिंकणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, राजीनाम्यावर ते म्हणाले, मी राजीनामा दिला देशातील लोकशाही धोक्यात येईल. राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकारकडून मला अटक केली जाईल. माझ्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर केरळे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांचा नंबर असणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. तर पंतप्रधान पदासाठी भाजपमध्ये चढाओढ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Hit And Run Case : पुण्यानंतर फडणवीसांच्या नागपुरात हिट अ‍ॅन्ड रन केस; मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं

2024 मध्ये महायुतीने जादुई आकडा गाठला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर अमित शहा होतील. यासाठी त्यांनी शाह यांच्या विधानाचा संदर्भही दिला. अमित शाह यांनी 2019 मध्ये 75 वर्षांवरील सर्व लोकांना निवृत्त करत असल्याच सांगितले होते. तर नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर 75 वर्षांवरील कोणालाही भाजप संघटनेत किंवा सरकारमध्येही पद देणार नसल्याचा नियम केला आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Arvind Kejriwal
Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी तपासाबाबत पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com