Rahul Gandhi Press Conference Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींनी टाकला हायड्रोजन बॉम्ब; भाजपचे दोन सरपंच ते ब्राझीलची मॉडेल... दिले धक्कादायक पुरावे

Rahul Gandhi on Election Commission: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका तरूणीचा फोटो दाखविला. तिने हरियाणात 22 वेळा 10 मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला.

Rajanand More

Rahul Gandhi Reacts Sharply, Calls It a Democratic Scandal : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मतदारयाद्यांमधील कथित घोळाबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकला. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेसची सत्ता येणार असे दिसत होते. पण प्रत्यक्ष निकालात पराभव झाला. याबाबत अधिक सखोल अभ्यास केल्यानंतर अनेक धक्कादायक तथ्य समोर आल्याचा दावा राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी केला.

दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व भारतीय निवडणूक आयोगावर ‘ऑपरेशन सरकार चोरी’चा आरोप केला. ते म्हणाले, हरियाणामध्ये सर्व पोल्सने काँग्रेसला सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. मोठा विजय मिळणार, हे निश्चित होते. पण हरियाणाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच आश्चर्यकारक गोष्ट घडली. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसला 73 जागा मिळाल्या तर भाजपला 17 मिळाल्या. त्यानंतर मग आम्ही अधिक सखोल अभ्यास केला.

‘ऑपरेशन सरकार चोरी’ झाल्याचे शंभर टक्के पुरावे आहेत. 6 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रकार परिषदेत हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी म्हणतात, 'आमच्याकडे सर्व व्यवस्था आहेत, आमचाच विजय होईल.' त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सगळे सांगते. त्यानंतर निकाल येतो आणि काँग्रेसचा 22 हजार 779 मतांनी पराभव होतो, असे राहुल यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका तरूणीचा फोटो दाखविला. तिने हरियाणात 22 वेळा 10 मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला. तिचे मतदारयादीत सीमा, स्वीटी, सरस्वती अशी वेगवेगळी नावे आहेत. हे बीएलओचे काम नाही. हे थेट सेंट्रलाईज ऑपरेशन होते. ही महिला ब्राझिलमधील मॉडेल असल्याचे सांगत राहुल यांनी बॉम्ब टाकला. अशीच हरियाणामध्ये 25 लाख मतांची चोरी झाली आहे. त्यामध्ये पाच श्रेणी आहेत. दुबार मतदार तब्बल 5 लाख 21 हजार तर 19 लाख 26 हजारांहून अधिक मतदारांची काही काळात नोंदणी झाल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

भाजपचे सरपंद डालचंद यांचे उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या मतदारसंघातही नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मात्र वेगळे आहे. त्यांच्या मुलाचे नावही दोन्ही ठिकाणी आहे. मात्र वडिलांचे नाव बदललेले नाही. मथुरा जिल्ह्यातील भाजपचे सरपंच प्रल्हाद यांचेही दोन्ही राज्यात मतदार आहेत. हा आकडा हजारोंच्या घरात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. अशी व्यवस्था भाजपने केली आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची ‘ही’ व्यवस्था होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT