Bipin Rawat
Bipin Rawat Sarkarnama
देश

हेलिकॉप्टरच्या घातपाताची शक्यता, चीनचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न?

सरकारनामा ब्युरो

पुणे : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघतात निधन झाले आहे. आज दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह एकूण १४ जण प्रवास करत होते. यातील १४ जणांपैकी रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय वायूसेनेने दिली आहे. मात्र हा घातपात असावा अशी शक्यता निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, बिपीन रावत यांचे निधन ही अत्यंत दुःखद बाब आहे. रावत हे एक आऊटस्टॅन्डिंग ऑफिसर होते. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रावत यांच्याबद्दल सांगताना महाजन म्हणाले, वडिलांच्या बटालियनमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. ट्रेनिंगमध्येच उत्कृष्ट कामगिरीसाठी पदकही मिळवले होते. ईशान्य भारतातील घुसखोरी असो किंवा पाकिस्तानसोबत झालेली चकमक असो. या सर्व ठिकाणी तसेच काश्मिरमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ठ काम केले होते.

यानंतर रावत यांनी दशाचे सीडीएस म्हणूनही उत्कृष्ट काम केले. त्यांच्या अपघाताची कारणे सांगायची झाली तर बिपीन रावत हे आपल्या टीम सोबत हेलिकॉप्टरमध्ये होते आणि अपघात झाला. मेकॅनिकल फेल्युअर, हवामानात बदल होणे किंवा आकाशात उडणारा पक्षी समोर आला तरी अपघात होण्याची शक्यता असते. याव्यतिरीक्त काही पायलट एरर (चूक) होती का हे ही बघणे गरजेचे आहे. मात्र सगळ्यात मोठी शक्यता घातपाताची वाटते. जर तसे असेल तर यामागे कोणता देश असेल त्यांना जशास तसे उत्तर द्यावेच लागेल. चीन सारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का हे ही पहावे लागेल, असेही महाजन म्हणाले.

जनरल बिपीन रावत हे आज तमिळनाडूच्या निलगीरी पर्वत रांगेत वसलेल्या डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज विलींग्टन याठिकाणी तिथले प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले होते. परंतू जाताना तमिळनाडूतील कुन्नूरजवळ अपघात झाला. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT