latest news hijab controversy 
देश

वाद पेटला; बुरखा विरुद्ध भगवं उपरणं

कर्नाटकात शिक्षण कायद्यानुसार शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ गणवेश परिधान करणं अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळुर : कर्नाटकातील (Karnatak) उडुपी जिल्ह्यातील सरकारी पीयू महिला महाविद्यालयातील बुरखा वाद (hijab controversy) आता अधिकच चिघळत चालल्याचे दिसत आहे. पीयू महिला महाविद्यालयात सुरु झालेला हा वाद बघता बघता राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही पसरल्याचे दिसत आहे. (latest news hijab controversy)

कर्नाटकातील उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थींनींचा एक गट आणि भगव्या रंगाच्या शॉल परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गट समोरासमोर आले. त्यावेळी भगव्या शॉली परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाची आज (८ फेब्रुवारी) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थीनींना बुरखा परिधान करण्याची परवानगी मिळणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली होती. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे. रेशम फारुख नावाच्या विद्यार्थीनीचा भाऊ मुबारक फारूक हे न्यायलयात विद्यार्थीनींची बाजू मांडणार आहेत. उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- काय आहे प्रकरण?

कर्नाटकात सध्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बुरखा परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. शाळेत बुरखा घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून निषेधही करत आहेत. आता एकीकडे मुस्लिम विद्यार्थीनी या गोंधळामुळे नाराज आहेत तर दुसरीकडे शाळेतील शिक्षणावरही परिणाम झाला आहे. या वादात कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेत कर्नाटक शिक्षण कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार शाळेतील प्रत्येकाला एकच गणवेश परिधान करावा लागणार आहे. खाजगी शाळांना स्वतःचा गणवेश निवडता येईल. पण सरकारी शाळांमध्ये ठराविक गणवेश घालूनच यावे लागेल. असा आदेश देण्यात आला.

या आदेशानंतर बुरखा वाद आणखीनच वाढला आहे. जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाची मान्यता नसताना हा सर्व प्रकार करण्यात आला. पण नंतर हा ट्रेंड पुढे गेला आणि इतर कॉलेजमधल्या अनेक मुलीही असाच बुरखा घालून येऊ लागल्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्या निषेधाला प्रतिसाद देण्यासाठी भगवे स्कार्फ बांधायला सुरुवात केली. ज्यामुळे हा वाद अधिकच विकोपाला गेला.

- मुस्लिम विद्यार्थींनी काय बोलल्या?

मुस्लीम विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की त्या आतापर्यंत बुरखा घालूनच शिक्षण घेत आल्या आहेत. याआधी कधीच यावरून वाद झाला नाही. त्यांच्या घरातील इतर महिलांनीही असाच अभ्यास केला आहे. पण आता बुरखा विरोध का केला जात आहे, असा सवाल या विद्यार्थींनींनी केला आहे. तर दुसरीकडे, शिक्षणाचा युनिवर्मशी काहीही संबंध नाही आणि प्रत्येकजण शाळेत सारखाच राहिला पाहिजे, असे मानणाराही एक वर्ग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT