लतादीदींच्या स्मारकाला मनसेचा विरोध; तुमच्या राजकारणासाठी...

मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं स्मृतीस्थळ उभारले जावे, अशी मागणी केली जात आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झाले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं स्मृतीस्थळ उभारले जावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्याबाबत राम कदम यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे ही मागणी केली आहे. भाजप व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना शिवसेना (Shivsena) आणि मनसेने (MNS) मात्र या मागणीला विरोध केला आहे.

लतादीदींच्या शिवाजी पार्क येथील स्मारकाच्या मागणीला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कडाडून विरोध केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.''असे ट्विट करत त्यांनी शिवाजी पार्कवरील लतादीदींच्या स्मृतीस्थळाच्या मागणीला मनसेच्या वतीने विरोध दर्शवला आहे.

Raj Thackeray
लतादीदींवरील ट्रोलवरुन प्रकाश आंबेडकर संतप्त ; टि्वट करुन झोडपलं

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील भाजपच्या या मागणीला विरोध करत, या प्रकरणाचे राजकारण करु नका असे म्हटले आहे. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण करु नये. काहींनी शिवाजीपार्कवर लतादीदींच स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी केली. पण लतादीदींच्या स्मारकाबाबत देशाने विचार करायला हवा. लतादीदी राजकारणी नव्हत्या. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही त्यांचं स्मृतीस्थळ उभारण्याचा विचार करावा लागेल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही याचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. तसेच, लतादीदींच्या निधनानंतर सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवरही त्यांनी संताप व्यक्त केला. ''काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो,'' असे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com