Assam Chief Minister Himanta Sarma Sarkarnama
देश

Himanta Sarma News : 'राम-कृष्णाची नावे असावीत झारखंडमधील शहरांना' ; हिमंता सरमांचे मोठं वक्तव्य!

INDIA Alliance Vs Himanta Sarma : INDIA आघाडी तक्रार घेऊन पोहचली निवडणूक आयोगाकडे, जाणून घ्या यावर हिमंता सरमा यांची काय आली आहे प्रतिक्रिया?

Mayur Ratnaparkhe

Himanta Sarma on Cities name of Jharkhand झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे सह-प्रभारी असलेले हिमंता बिस्वा सरामा यांनी झारखंडमधील शहरं आणि जिल्ह्यांच्या नावांबाबत एक वक्तव्य केलं आहे, ज्याविरोधात विरोधकांच्या इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

हिमंता सरमा(Himanta Sarma) यांनी म्हटले आहे की, 'झारखंडचा हुसैनाबादशी काय संबंध आहे? मी म्हणतो की, झारखंडमधील शहरे, जिल्ह्यांची नावे राम, कृष्ण, नीलांबर-पीतांबर आणि अन्य नावावर असायला हवीत. परंतु जर आपण अशा एखाद्या शहराचं नाव ठेवत असाल, जे त्या शहराच्या संस्कृतीशी जुडलेले नाही, तर त्याचे नाव बदलले गेले पाहिजे. कोलकाताचं नाव देखील बदललं गेलं आहे. येथील नावंही बदलली पाहिजेत, मी मुख्यमंत्र्यांकडे याची शिफारस करेन.'

हिमंता सरमा यांच्या वक्तव्यानंतरक विरोधकांची इंडिया आघाडीचे(INDIA Alliance) शिष्टमंडळाने झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी रविकुमार यांची भेट घेतली आणि आपली तक्रार नोंदवली. यामध्ये हिंमता सरमा यांच्याविरोधात कथितरित्या भडकाऊ आणि फूट पाडणाऱ्या भाषणांबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तर यावर हिमंता सरमा यांनी म्हटले की, माझ्याविरोधात तक्रार का केली गेली? मी काय म्हणत आहे? जर मी घुसखोरांबाबत बोलतोय तर त्यांना एवढा त्रास का होतोय? कुठं लिहिलं आहे, कोणत्या कायद्यात म्हटलं आहे की घुसखोरांविरोधात बोलणं चुकीचं आहे? हिंदूंबाबत बोलणं म्हणजे मुस्लिमांवर निशाणा साधणं नसतं. मी मुस्लिम शब्दही नाही उच्चारला. भारत एक हिंदू सभ्यता आहे आणि त्याच्या रक्षणार्थ बोलणं उचित आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT