Jharkhand BJP News : झारखंडमध्ये भाजपला धक्का ; निवडणुकीआधीच प्रदेश उपाध्यक्षांनी सोडला पक्ष!

BJP Pranab Verma enters JMM : झारखंड मुक्ती मोर्चामध्ये केला आहे प्रवेश; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वागत करत दिले पक्षाचे सदस्यत्व
Pranab Verma, Hemant soren
Pranab Verma, Hemant sorenSarkarnama
Published on
Updated on

Hemant soren on BJP Pranab Verma : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पक्ष सोडून गेले आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ति मोर्चात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. याचा सर्वाधिक परिणामा गिरिडीहमध्ये जाणवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रणव वर्मा हे कोडरमाचे माजी खासदार रीतलाल प्रसाद वर्मा यांचे पुत्र आहेत. झारखंडमध्ये भाजपची(BJP) पाळमूळं रुजवण्यात आणि पक्षाला जनाधार मिळवून देण्यात रीतलाल प्रसाद वर्मा यांचे मोठे योगदान होते. मात्र आता त्यांच्या मुलाने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने, याचा परिणाम आगामी काळात नक्कीच दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Pranab Verma, Hemant soren
Hemant Soren: हेमंत सोरेन यांचं वय 5 वर्षांत 7 वर्षे वाढले! नेमकी गडबड काय आहे?

झारखंड मुक्ति मोर्चाच्या(JMM) नेत्यांनी वर्मा यांचे पक्षात स्वागत केले. स्वत: हेमंत सोरेन यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. शिवाय, त्यांच्या पक्ष प्रवेशाचे फोटोही शेअर केले आणि लिहिले की, आज भाजप नेते प्रवीण वर्मा आणि आजसू नेते विकास राणा यांनी आपल्या समर्थकांसह झामुमो परिवारात प्रवेश केला. झामुमो परिवाराची व्याप्ती दिवस-रात्र वाढत आहे. तुम्ही सर्वांचे झारखंड मुक्ति मोर्चा परिवारात स्वागत आहे, जोहार!

Pranab Verma, Hemant soren
Narendra Modi : मोदींनी महाराष्ट्रातील प्रचाराचा नॅरेटिव्ह सेट केला! खर्गेंनीच आयते कोलीत दिले हाती...

झारखंड विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर भाजप उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आले आहेत.

मागील पाच वर्षांत सोरेन यांचे वय सात वर्षे कसे वाढले, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. उमेदवारी अर्जामध्ये सोरेन यांनी त्यांचे वय वाढवून दाखवले असल्याच दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोरेन यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

(Editedc by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com