Hindu Temple Sarkarnama
देश

Hindu Temples : मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत...! फक्त हिंदूंनाच प्रवेशाचे फलक लावण्याचे कोर्टाचे आदेश

Rajanand More

Tamil Nadu News : मद्रास हायकोर्टाने हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशाबाबत तमिळनाडू सरकारला महत्त्वाचा आदेश दिला आहे. हिंदू मंदिरांमधील ‘ध्वजस्तंभ (कोडिमारम) परिसराच्या पुढे जाण्यास गैरहिंदूंना बंदी’ असे फलक लावण्यास कोर्टाने सरकारला सांगितले आहे. हिंदूंनांही आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मंदिरांना पिकनिक स्पॉट किंवा पर्यटनस्थळ समजू नका, मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांशिवाय इतर काहीही करणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. (Hindu Temples)

मद्रास हायकोर्टाच्या (Madras High Court) मदुराई खंडपीठाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी तमिळनाडू (TamilNadu) सरकारला हा आदेश दिला आहे. डी. सेंथिल कुमार यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. अरुल्मिगु पलानी धनदायुतपानी स्वामी मंदिर आणि संबंधित इतर मंदिरांमध्ये केवळ हिंदूंना प्रवेशाला परवानगी देण्याचे आदेश देण्याची मागणी सेंथिल कुमार यांनी याचिकेत केली होती.

मंदिरांच्या सर्व प्रवेशद्वारांवर बंदीबाबतचे फलक लावण्याची विनंतीही सेंथिल यांनी केली होती. भगवान मुरुगन मंदिर दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी येथे आहे. कोर्टाने या याचिकेवर सुनावणीदरम्यान म्हटले की, हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या गैरहिंदू प्रवेशास परवानगी देऊ नये. एखादा गैरहिंदू व्यक्ती मंदिरात दर्शन घेण्यासाठी उत्सुक असेल तर त्याच्याकडून लिहून घ्यावे की, तो हिंदू धर्मातील व मंदिरातील सर्व चालीरीतींचे पालन करेल. त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेशाला परवानगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एखाद्या गैरहिंदूला परवानगी दिल्यास मंदिरातील रजिस्टरमध्ये त्याची नोंद करावी. मंदिर व्यवस्थापनाने नियमांचे, चालीरीतींचे सक्तीने पालन करून मंदिर परिसराची देखभाल करावी, असे न्यायालयाने म्हटले. तसेच हा मुद्दा गंभीर असल्याने सर्व हिंदू मंदिरांना लागू व्हायला हवा. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांसाठी हा आदेश लागू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदू धर्माप्रमाणेच सर्व धर्मांना त्यांच्या अधिकारांचे, प्रथांचे पालन करण्याचे अधिकार कायद्यानुसार आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT