Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांना पत्नीमुळे मोठा झटका; पक्षाच्या बड्या नेत्यानं सोडली साथ

Dimple Yadav : डिंपल यादव यांना मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर...
Dimple Yadav, Manoj Yadav, Akhilesh Yadav
Dimple Yadav, Manoj Yadav, Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने आघाडी घेत सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून टाकली. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. पण त्यामुळे अखिलेश यांना पहिला मोठा झटका बसला आहे. (Lok Sabha Election 2024)

अखिलेश (Akhilesh Yadav) यांचे विश्वासू मानले जाणारे नेते मनोज यादव (Manoj Yadav) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. डिंपल (dimple Yadav) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पक्षात बंड सुरू झाल्याने अखिलेश यांची डोकेदुखी वाढली आहे. यादव हे उद्योगपतीही असून अखिलेश यांची निकटवर्ती मानले जातात. ते आरसीएल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Dimple Yadav, Manoj Yadav, Akhilesh Yadav
LokSabha Election 2024 : अखिलेश यांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; पत्नीसह 16 उमेदवारांची नावं जाहीर

पक्षाला सोडचिठ्ठी देताना यादव यांनी गंभीर आरोप केले आहेत. पक्षामध्ये कौटुंबिक कलह अधिक असून स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून एकमेकांचे पाय ओढले जात असल्याचे यादव यांनी सांगितले. ते मैनपुरी नगरमधील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून सपामध्ये (Samajwadi Party) सक्रीय होते. मात्र, पक्षामध्ये महत्वाची पदे न घेता ते पडद्यामागूनच अखिलेश यांची मदत करत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यादव यांना विजयी करण्यात मनोज यादव यांचाही मोठा वाटा होता. पक्ष सोडल्यानंतर ते म्हणाले, पक्षा आता लोकांसाठी काम करत नाही. भाजपमध्ये कोणताही पक्षपात न करता काम केले जात आहे. आपल्या कंपनीकडेही कोट्यवधी रुपयांची कामे आहेत. सपाची सत्ता असताना कामे मिळण्यात अनेक अडचणी आल्याचेही त्यांनी सांगितले. डिंपल यादव यांनी 2022 मध्ये मैनपुरी मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.

सपाच्या उमेदवारांची पहिली यादी –

1. संभल - शाफिकुर रहमान बर्क

2. फिरोजाबाद - अक्षय यादव

3. मैनपुरी - डिंपल यादव

4. एटा - देवेश शाक्य

5. बदायू - धर्मेंद्र यादव

6. खीरी - उत्कर्ष वर्मा

7. धौरहरा - आनंद भदौरिया

8. उन्नाव - अनू टंडन

9. लखनऊ - रविदास मेहरोत्रा

10. फर्रुखाबाद - नवल किशोर शाक्य

11. अकबरपूर - राजारामपाल

12. बांदा - शिव शंकर सिंह

13. फैजाबाद - अवधेश प्रसाद

14. आंबेडकरनगर - लालजी वर्मा

15. बस्ती - राम प्रसाद चौधरी

16. गोरखपूर - काजल निषाद

Dimple Yadav, Manoj Yadav, Akhilesh Yadav
Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाला मिळालेली नवी डेडलाईनही अपुरी ठरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com