Budget Session 2024 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक वाक्यावर वाजली बाकं; मोदीही थकले नाहीत…

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेत अभिभाषण...
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. त्यांनी सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करीत अनेक कामांची प्रशंसा केली. अयोध्येतील श्रीराम मंदिर, महिला आरक्षण, कलम 370, चांद्रयान मोहीम, कोरोनाकाळातील कामगिरी, जी-20 अशा विविध कामांचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केला. (Budget Session 2024) 

राष्ट्रपतींच्या प्रत्येक वाक्यावर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व केंद्रीयमंत्र्यांनीही भाषणातील सरकारच्या कामगिरीचे कौतुक होत असताना बाके वाजवली. राष्ट्रपतींनी राम मंदिर (Ram Mandir) तसेच रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा उल्लेख करताच सभागृहात जय श्रीरामचा नारा सदस्यांनी दिला.

President Droupadi Murmu
Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांना पत्नीमुळे मोठा झटका; पक्षाच्या बड्या नेत्यानं सोडली साथ

राष्ट्रपतींचे नवीन संसद (Parliament) इमारतीतील हे पहिले अभिभाषण होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी याचा उल्लेख केला. राष्ट्रपती अभिभाषणादरम्यान म्हणाल्या, मागील अनेक दशकांपासून देशातील नागरिक वाट पाहत असलेली अनेक काम सरकारने मागील दहा वर्षांत पूर्ण केले आहे. भारत विकसित देशाच्या मार्गाने वेगाने पुढे जात असून त्यासाठी सरकारची आर्थिक धोरणांशी संबंधित योग्य निर्णय कारणीभूत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिराचे स्वप्न आता अस्तित्वात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. महिला आरक्षणाचा कायदा संसदेत पारित झाल्याबद्दलही त्यांनी सरकारचे कौतुक केले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमधून मागे घेण्यात आलेले कलम 370 चा उल्लेखही त्यांनी केला. देशातील तीन जुने गुन्हेविषयक कायदे आता नवीन स्वरुपात आणल्याने न्यायावर भर दिला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोनाकाळात सरकारने केलेल्या कामगिरीचेही राष्ट्रपतींनी कौतुक केले. जी-20च्या माध्यमातून सरकारने पहिल्यांदाच असे उपक्रम लोकांपर्यंत नेले. युवक, महिलांच्या आशा-आकांक्षा पूर्णत्वाला नेण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. शिक्षण, सामाजिक, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर सरकारने केलेल्या कामगिरीचा उल्लेख राष्ट्रपतींनी यावेळी केला. देशातील 140 कोटी लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

R...

President Droupadi Murmu
Lok Sabha Election 2024 : नितीशकुमारांच्या परतण्याने भाजपला कितपत फायदा? प्रशांत किशोर म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com