Amit Shah
Amit Shah Sarkarnama
देश

दिल्लीनंतर अमित शहांचा पंजाबलाही दणका; राजधानीत येऊन केली मोठी घोषणा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) तीनही महापालिकांचे विलीनीकरण करून केंद्र सरकारने नुकताच आम आदमी पक्षाला (AAP) मोठा दणका दिला आहे. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक विजय मिळवून पंजाबमध्ये (Punjab) सत्ता स्थापनेनंतर आपला दुसरा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी पंजाबची राजधानी चंडीगडमध्ये (Chandigarh) येऊन सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा केली.

चंदीगड पोलिसांच्या विविध योजनांचे उद्घाटन करण्यासाठी शहा हे रविवारी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषमा केल्या. शहा म्हणाले की, केंद्र शासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्यात आले आहे. चंडीगड प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठीचे सेवा नियम आता केंद्रीय नागरी सेवांप्रमाणे असतील, अशी घोषणाही शहा यांनी केली.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सध्याच्या एक वर्षांच्या सुट्टीऐवझी दोन वर्ष मिळतील. ही चंडीगडमधील कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती. आज मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याची अधिसुचना उद्या काढली जाईल आणि आगामी आर्थिक वर्षापासून त्याचे फायदे सुरू होतील, असंही शहा यांनी स्पष्ट केलं.

शहा यांच्या या घोषणेवर आपने सडकून टीका केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 2017 पासून 2022 पर्यंत काँग्रेसची पंजाबमध्ये सत्ता होती. अमित शहा यांनी त्यावेळी चंडीगडची ताकद हिसकावून घेतली नव्हती. पंजाबमध्ये आपची सरकार बनताच अमित शहा यांनी चंडीगडच्या सेवा हिसकावून घेतल्या आहेत. आपचे यश पाहून भाजप घाबरली आहे, अशी टीका सिसोदिया यांनी केली आहे.

काँग्रेसकडून (Congress) यावर प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे नेते सुखपाल सिंह खैरा म्हणाले, चंडीगडवर नियंत्रण आणि पंजाबच्या अधिकारांचे हनन करण्याच्या भाजपच्या या हुकुमशाही निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत अद्याप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान किंवा मंत्रिमंडळातील एकाही नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT