Amit Shah Yogi Adityanath sarkarnama
देश

Amit Shah : अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले देखील नाही, नेमकं काय बिनसलंय?

Roshan More

Amit Shah News : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अपयशामुळे भाजपला केंद्रात स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. यासाठी योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरत टार्गेट केले जात आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे दिल्लीत जात त्यांनी नेतृत्वबदलासाठी केंद्रीय नेत्यांना गळ घातली होती.

केशव प्रसाद मौर्य हे गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यामुळे यामागे शाह हे असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांमध्ये अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजप मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीत अमित शाह हे येत असताना सर्वांना नमस्कार करत आहेत. मात्र, आदित्यनाथ यांना नमस्कार न करता पुढे जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी देखील शाह यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या राजनाथ सिंह यांना नमस्कार केल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.

नेतृत्व बदलाच्या चर्चा

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यामुळे अपयश आल्याची टीका स्थानिक नेते करत आहेत. आदित्यनाथ यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य येथील सक्रिय झाले होते. भाजपच्या उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांच्यासोबत त्यांनी केंद्रीय नेत्यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू होत्या.

मोदींनाही नमस्कार नाही

अमित शाह यांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोदी यांना नमस्कार केला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील योगी आदित्यनाथ यांनी नमस्कार केला नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

जितेंद्र आव्हाडांचा टोला

आदित्याथ गृहमंत्री अमित शाह यांना नमस्कार करत नसल्याचा तसेच शाह हे आदित्यनाथ यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत काय बिनसलंय कुणास ठाऊक, योगीजींनी फक्त राजनाथसिंह यांना हात जोडून नमस्कार केला! असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT