Shirur News : दादा, स्वगृही परत या, कार्यकर्त्यांनी घातली साद !

Ajit Pawar NCP : लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती.
Ajit Pawar- Adhalrao Patil- Eknath Shinde
Ajit Pawar- Adhalrao Patil- Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक भागातील महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे.

या निवडणुकीत याचा फटका बसू नये, यासाठी इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षात येण्याची साद घालण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही अशीच काही साद त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घालण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. निवडणुकीच्या अगोदर काही दिवस आढळरावांनी शिंदे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Ajit Pawar- Adhalrao Patil- Eknath Shinde
Ajit Pawar : "पालकमंत्री अजितदादा अन् केंद्रीय मंत्री मुरलीअण्णांमध्ये तरी समन्वय आहे का?"

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परत शिवसेनेत यावं अशी विनंती केली आहे. लांडेवाडी येथे झालेल्या आढळराव पाटील यांच्या जनता दरबारावेळी ही विनंती करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे हवेली तालुका अध्यक्ष विपुल शितोळे यांनी ही विनंती आढळराव पाटील यांना केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या या विनंतीमुळे माजी खासदार आढळराव आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत पुन्हा स्वगृही जाणार का? याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

Ajit Pawar- Adhalrao Patil- Eknath Shinde
Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

जनता दरबारामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना परत पक्षात येण्याची विनंती केली. दादा आम्हाला तुमची गरज आहे, परत या अशी साद आढळराव पाटील यांना घालण्यात आली. कार्यकर्त्यांचं यावेळचे प्रेम पाहून आढळराव पाटील देखील भारावून गेले होते. अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेच्या घड्याळ चिन्हावर आढळरावांनी शिरूर (Shirur) लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी त्यांचा मोठा पराभव केला. कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com