New Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सोमवारी भाषण झाले. त्यांनी अनेक मुद्यांवर बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. यावेळी राहुल यांनी लोकसभेत निर्मला सीतारमण आणि त्यांच्या मंत्रालयातील सहकाऱ्यांचा हलवा बनवतानाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी फोटो दाखवत असतानाच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले. त्यावर बराच गदारोळही झाला. पण त्यानंतर पुढे बोलताना राहुल यांनी सरकारला घेरलं. ते म्हणाले, देशात 73 टक्के दलित, आदिवासी आणि मागसवर्गातील लोक आहेत. हे देशाची मुख्य ताकद आहे. पण त्यांना बिझनेट कॉर्पोरेट इंडिया, सरकारमध्ये जागा मिळत नाही. देशात हलवा वाटला जात असून त्यातही लोकं नाहीत.
मला मिळालेल्या माहितीनुसार, 20 अधिकाऱ्यांनी देशाचे बजेट तयार केले आहे. देशात हलवा या लोकांनी वाटायचे काम केले आहे. त्यातील 90 टक्केपैकी एक ओबीसी आणि एक अल्पसंख्यांक आहे. तेही या फोटोत नाहीत. दोन-तीन टक्के लोक हलवा वाटत असून दोन-तीन टक्के लोकांनाच मिळत आहे, असे राहुल यांनी बोलताच निर्मला सीतारमण यांनी दोन्ही हात डोक्याला लावले.
राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचीही जोरदार मागणी केली. ते म्हणाले, तुमचा चक्रव्यूह सर्वसामान्य लोक म्हणजे अर्जून असून ते तोडणार आहेत. पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास आम्ही तोडला आहे. ते माझ्या भाषणाला येणार नाही. हिंसा, तिरस्कार हा भारताचा स्वभाव नाही. जातनिहाय जनगणना या सभागृहात आम्ही मंजूर करून दाखवू. यामुळे त्यांचा चक्रव्यूह तुटून जाईल, असे सांगत राहुल गांधींनी आपले भाषण संपविले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल यांच्या भाषणावर बोलताना म्हणाले, ‘देशाच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा असताना अग्नीवरीच्या मुद्यावरून भरकटवले जात आहे. त्यावर मी तुम्ही सांगाल तेव्हा बोलायला तयार आहे.’ त्यावर राहुल यांनीही लगेच पलटवार करत शहीद अग्नीवीरांच्या कुटुंबाला भरपाई दिली आहे, असे त्यांनी सांगितले. पण हे चुकीचे आहे. अग्निवीरांना विमा दिला होता, भरपाई दिली नव्हती, असे राहुल म्हणाले.
ओम बिर्ला म्हणाले, तुम्ही नियमप्रक्रिया आधी व्यवस्थित वाचा. कधीही संसदीय प्रक्रियेत कोणताही सदस्य टिप्पणी करत नसतात. तो अधिकार अध्यक्षांना आहे. तुम्हाला कोणती अडचण असेल तर चेंबरमध्ये येऊन भेटा. पण संसदेतील व्यवस्थेवर संसदेत प्रश्न उपस्थित करू नका, अशी सूचना बिर्ला यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.