Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah On CAA : सीएए कायद्याबाबत अमित शाहांची मोठी घोषणा; देशात लवकरच...

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतात 'सीएए' कायदा लागू होणार असल्याची माहिती अमित शाहांनी दिली.

Ganesh Thombare

Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए कायद्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतात 'सीएए' कायदा लागू होणार असल्याची माहिती अमित शाहांनी दिली आहे. 2024 च्या निवडणुकीआधी 'सीएए' कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढली जाईल आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. (Amit Shah On CAA)

सीएए कायदा लागू करण्याचा उद्देश फक्त अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता देणे हा आहे. तसेच हा कायदा लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हे काँग्रेसने दिलेले वचन होते. देशाचे विभाजन झाले होते त्यावेळी अल्पसंख्याकांवर अन्याय झाला. तेव्हा काँग्रेसने वचन देत त्यांना नागरिकता दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आता यापासून मागे हटत असल्याचं शाहांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी सरकारने सादर केलेल्या सीएए कायदा लागू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी, ख्रिश्चन यांच्यासह गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे, हेच उद्दिष्ट असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारने 2019 मध्ये संसदेत 'सीएए' हा कायदा मंजूर केला. त्यावेळी संपूर्ण देशात या 'सीएए'कायद्याच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. तसेच हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली होती. यानंतर 'सीएए' ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असं शाह यांनी म्हटलं होतं. अखेर आता लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतात 'सीएए' कायदा लागू होणार असल्याचं शाहांनी सांगिलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT