Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊतांनी पाकिस्तान, चायनामध्ये जाऊन पहावे ; नितेश राणेंनी सुनावले...

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही धोक्यात असल्याची 'टेप' राऊत यांनी आज देखील वाजवली असल्याची टीका.
Sanjay Raut, Nitesh Rane
Sanjay Raut, Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane on Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाही धोक्यात असल्याची टीका केली होती. या टीकेचा समाचार भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही धोक्यात असल्याची 'टेप' राऊत यांनी आज देखील वाजवली आहे. विश्वात सर्वात ताकदीचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या काळापेक्षा लोकशाही मजबूत झाली हे राऊत यांना हजम होत नाही म्हणून ही टीका करत आहे, अशा शब्दात राणेंनी सुनावले. Nitesh Rane on Sanjay Raut

लोकशाही आणि संविधान धोक्यात कसं असतं हे राऊत यांनी आपल्या आवडीच्या पाकिस्तान व चीनमध्ये जावून पाहावं किंवा ज्यांची ते सध्या अधिकृत नोकरी करतात त्यांच्या राहुल गांधींच्या मांडीवर बसून ऐकावं, अशी खिल्ली नितेश राणे यांनी संजय राऊत यांची उडवली. ते म्हणाले, राहुल गांधींच्या आजीने जी आणीबाणी लादलेली तेव्हा संविधान आणि लोकशाही कशी धोक्यात होती.

Sanjay Raut, Nitesh Rane
Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांचे तळ्यात मळ्यात, महाआघाडीचा जीव टांगणीला!

ना पत्रकार परिषद घ्यायचे अधिकार होते, ना कोणाला फोनवरती संजय राऊत जसे महिलांना शिव्या घालतात तसं करायचे अधिकार होते, ना त्यांचे मालक उद्धव ठाकरे नाशिकला जाऊन महाआरती करतात तेही करायचे अधिकार नव्हते, त्याच्या मालकाचा मुलगा नाईटलाइफ साजरा करतो हे सगळे तुम्हाला आत्ता करायला मिळत आहे.

म्हणजे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही अधिक मजबूत झाली आहे हे राऊत यांनी समजावं आणि मगच आपलं थोबाड उघडावं, अशा शब्दांत सुनावले. काल रात्री महाविकास आघाडी अधिकृतपणे तुटली, त्यांचा पोपट मेलेला आहे. हे मी जबाबदारीने बोलत आहे. उद्धव ठाकरेंना 23 जागा मिळत नाहीत. तर प्रकाश आंबेडकर यांना दोनपेक्षा जास्त जागा देत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी ही अधिकृत तुटलेली आहे, असा आरोप राणे यांनी केला. काल रात्री अक्षरशः कपडे फाडेपर्यंत वाद झाले. हे बाहेर येवून कितीही आव आणत असले तरीही येत्या काळात जनतेला कळेल की महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. ममता बॅनर्जीनी राहुल गांधीची न्याय यात्रा आपल्या भागात येवू देणार नाही असं जाहीर केलं आहे.

हे स्वतःच घर एकसंघ ठेवू शकत नाहीत आणि मोदींना हरवायला चालले आहेत. नाना पटोले व संजय राऊत आणि अन्य एका नेत्याचं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी फाडून केराच्या टोपलीत टाकलं आहे. पटोले व राऊत हे किती चिल्लर नेते आहेत. ह्यांची किती लायकी आहे. हे दाखवून दिलं आहे. या दहा वर्षांत उद्धव ठाकरे सहा वर्षे युतीमध्ये होते. मांडीला मांडी लावून बसले होते.

तेव्हा संविधान धोक्यात नव्हतं का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी करत पाटणकर यांनी मनीलॉन्ड्रीग केली होती का ? आदित्य ठाकरेंनी दिशा व सुशांत सिंहचा मर्डर केला होता का ? याबद्दल उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असेही आव्हान राणे यांनी दिले आहे.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut, Nitesh Rane
Ajit pawar On Bjp : विचारधारा सोडली म्हणणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं, भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com