Narendra Modi News : मोदीनंतर भाजपचा PM पदाचा पुढचा चेहरा कोण? 'हे' नाव सर्वात आघाडीवर

Political News : . 'मूड ऑफ द नेशन'च्या ओपनियन पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यावेळी सत्तेवर येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

Dehli News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या घडीला देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या बळावरच भाजपने देशात विस्तार केला आहे. देशासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही लोकप्रिय आहेत. महत्त्वाच्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 'मूड ऑफ द नेशन'च्या ओपनियन पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यावेळी सत्तेवर येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

देशात सर्वत्र मोदींचा चेहरा आहे. पण नरेंद्र मोदींनंतर पुढे कोण ? असा प्रश्न अनेक जणांना सतावत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही या मूड ऑफ नेशनच्या ओपनियन पोलने केला असून त्याचे उत्तरही या सर्वेमधून मिळाले आहे.

amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
Loksabha Election 2024 : शिर्डीत रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, उद्धव ठाकरेंनी ठोकला शड्डू तर...

2014 साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्याकाळी केंद्रातील काँग्रेसच्या दहा वर्षाची सत्ता उलथवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठे यश मिळवले होते. त्यानंतर भाजपाने एका मागून एक यशाची शिखरे गाठली. मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा असा आहे की, भाजपने एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत आहे.

2014 नंतर भाजपने अनेक विधानसभा निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे त्यांच्या विषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप हॅट्ट्रिक करेल, असा अंदाज आहे.

नरेंद्र मोदींनंतर 'या' नावाला पसंती

नरेंद्र मोदींनंतर (Narendra Modi) पुढे कोण ? असा प्रश्न अनेक जणांना सतावत असताना या प्रश्नाचे उत्तर मूड ऑफ द नेशनच्या ओपनियन पोलने शोधून काढले आहे. या सर्वेतून हाच प्रश्न सर्वसामान्यांना विचारण्यात आला. त्यावेळी 29 टक्के जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली, असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मोदींनंतर ते उत्तराधिकारी असल्याचे सर्वेतून पुढे आले आहे. त्यासोबतच 25 टक्के जणांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली. आदित्यनाथ मोदी यांचा वारसा पुढे नेऊ शकतात असे या मंडळींना वाटते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाह व योगी आदित्यनाथमध्ये फक्त 4 टक्के मतांच अंतर

या सर्वेतील महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्यामध्ये फक्त 4 टक्के मतांच अंतर आहे. दोघेही सध्या देशात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी दोघेही निगडीत आहेत. देशपातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारी दोन्ही नेत्यांकडे आहेत. त्यामुळे येत्या काळात या दोघांमध्ये कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.

गडकरींच्या नावाला 16 टक्के नागरिकांची पसंती

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना देखील देशातील 16 टक्के नागरिकांची पसंती दर्शवली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे विकासाच व्हिजन असलेला नेता म्हणून पाहिले जाते. पण सर्वेमध्ये असे दिसून आलय की, जनतेला जास्त कठोर छबी, निर्णय क्षमता असलेला नेता जास्त भावत असल्याचे पुढे आले आहे.

मूड ऑफ द नेशनच्या माध्यमातून 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान हा सर्वे करण्यात आला. सर्व लोकसभा मतदारसंघातील एकूण 35 हजार 801 जणांशी बोलून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात या सर्वेमुळे जोरदार चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मराठी गुरूच्या गावाला भेट देणार? 'स्वाभिमानी'ने पाठवले निमंत्रण

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com