UK Indian Women Raped 
देश

UK Indian Women Raped: युकेमध्ये घडला भयानक प्रसंग! एका २० वर्षीय भारतीय महिलेवर दिवसाढवळ्या दोघांचा अत्याचार; देश सोडण्याची दिली धमकी

UK Indian Women Raped: पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ही अत्याचारी घटना आणि हल्ला वांशिकदृष्ट्या द्वेषपूर्ण हेतूनच झाला असून हा गंभीर गुन्हा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

UK Indian Women Raped: यूकेमधील ओल्डबरी येथील एका पार्कमध्ये दिवसाढवळ्या एका २० वर्षीय शीख महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि या कृत्यानंतर तिला "तुझ्या देशात परत जा" अशा शब्दांत आरोपींनी तिला धमकावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या आधी टेम रोडजवळील एका परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ही अत्याचारी घटना आणि हल्ला वांशिकदृष्ट्या द्वेषपूर्ण हेतूनच झाला असून हा गंभीर गुन्हा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

या दोन्ही अत्याचार करणाऱ्या पुरुषांचं वर्णन पीडित महिलेनं पोलिसांसमोर केलं आहे. त्यानुसार हे दोघेही स्वतःला उच्चवर्णीय समजणारे गोरे पुरुष होते. यांपैकी एकाच्या डोक्यावर केस नव्हते तसंच तो अंगानं जाडजूड होता तसंच अंगात त्यानं गडद स्वेटशर्ट आणि हातमोजे घातलेले होते. तसंच दुसऱ्यानं सिल्व्हर रंगाच्या झिपसह राखाडी रंगाचा टिशर्ट घातलेला होता. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही, डॅशकॅम किंवा मोबाईल फुटेज मागवले आहे आणि या घटनेबाबत माहिती असलेल्या कोणालाही पुढं येण्याचं आवाहन वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे.

या हल्ल्यामुळं युकेमध्ये वास्तव्यास असलेल्या शीख समुदायात संताप आणि भीती निर्माण झाली आहे. कारण अलिकडच्या काही महिन्यांत इथं वंशवादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार प्रीत कौर गिल यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि याला 'अत्यंत टोकाचा हिंसाचार आणि वंशवादाचं कृत्य' असं संबोधलं आहे. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले की, "आपण युकेमध्ये आहोत. ओल्डबरी किंवा ब्रिटनमध्ये कुठेही वंशवाद आणि महिलांबद्दल द्वेषाला स्थान नाही. यासंच युकेमधील शीख समुदायाची सुरक्षितता भक्कम राहावी यासाठी आपण पोलिसांसोबत काम करणार असल्याचं वचनही त्यांनी दिलं आहे. या भयानंक घटनेनंतर पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवली असून तपास सुरू असताना पीडितेला तज्ज्ञांचे सहकार्यही मिळवून देण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT