Madhavi Lata Sarkarnama
देश

Madhavi Lata Vs Owaisi : ओवेसींना टक्कर देणाऱ्या माधवी लतांच्या अडचणीत वाढ; मुस्लिम महिलांचा बुरखा काढला

Hyderabad Lok Sabha Constituency : पोलिस अतिशय सुस्त दिसत आहेत, ते सक्रिय काम करत नाहीत. ज्येष्ठ नागरिक मतदार येथे येत आहेत, परंतु त्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही माधवी लता यांनी केला.

Sunil Balasaheb Dhumal

Hyderabad Political News : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांना जोरदार टक्कर देणाऱ्या भाजपच्या उमेदवार के. माधवी लता यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. ऐन मतदानादिवशी सोमवारी (ता. 13) त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी काही मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपासणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

देशात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात देशभर चर्चेत असलेल्या माधवी लता यांच्या समावेश आहे. त्यांचा हैदराबादचे चार वेळा खासदार राहिलेले आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी सामना होत आहे. काही वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने माधवी लता यांचे नाव देशभर गाजले. यानंतरही ऐन मतदानादिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माधवी लता Madhavi Lata या मतदान केंद्रावर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगत आहे. चेहरा पाहून त्या मतदार ओळखपत्रावरील छायाचित्रांशी तो जुळवून पाहत होत्या. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून माधवी लतांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. हा व्हिडिओ ओवेसींनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला असला तरी त्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्या कृतीचे माधवी लता यांनी समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले, मी लोकसभेची उमेदवार असून मला कायद्यानुसार मतदार ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. तसेच मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे. त्यांनी मी अत्यंत नम्रतेने चेहरे आणि ओखळपत्र तपासण्याबाबत विनंती केली होती. आता यावर कोणाला मोठा विरोध करायचा असेल तर त्याकडे मी लक्ष देत नाही. या विरोधातून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसून येते, असा टोलाही माधवी लता यांनी लगावला.

पोलिस अतिशय सुस्त दिसत आहेत, ते सक्रिय काम करत नाहीत. ज्येष्ठ नागरिक मतदार येथे येत आहेत, परंतु त्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने तिहेरी तलाक आणि मुस्लिम तरुणांना नोकऱ्या दिल्याने मुस्लिम मतदारांचा पाठिंबाही आपल्यालाच मिळणार, असा दावाही माधवी लता यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हैदराबात लोकसभा मतदारसंघ हा मुस्लीमबहुल आहे. हा मतदारसंघ असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi यांचा बालेकिल्ला समजला जातो. आता येथे माधवी लता यांनी आपले मोठे स्थान निर्माण केले असून आता त्या ओवेसींना धक्का देणार का, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT