Kokan News : लोकसभेला ठाकरेंना मदत, 'कोकण पदवीधर'वर काँग्रेसचा दावा; प्रवीण ठाकूर यांचं पटोलेंना पत्र

Raigad Congress रायगडसह कोकणात काँग्रेसचा एकही आमदार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसने मदत केली आहे.
Nana Patole, Pravin Thackur
Nana Patole, Pravin Thackursarkarnama

Kokan News : विधान परिषदेतील कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. २२ मे रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. कोकणसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्रही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.

रायगडसह कोकणात काँग्रेसचा एकही आमदार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणातील शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसने मदत केली आहे. यामुळे कोकणात पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस दावा करणार आहे. त्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून ॲड. ठाकूर हे प्रयत्नशील आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह चौघाआमदारांचा विधान परिषद सदस्यपदाचा कार्यकाल सात जुलैला संपत आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील आमदारांचा समावेश आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने या चार मतदारसंघांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Nana Patole, Pravin Thackur
Kokan Politics : तब्बल दहा वर्षांनंतर केसरकरांच्या उंबऱ्याला लागले राणेंचे पाय; एकेकाळच्या विरोधकांचा एकत्रित प्रचार...

सध्या कोकण पदवीधरसाठी उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर, कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेसने मदत केली आहे. त्यामुळे आता कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने दावा करण्यास सुरवात केली आहे. याबाबतचे पत्रही ॲड.प्रवीण ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला ही जागा सोडणार का, याची उत्सुकता आहे.

Nana Patole, Pravin Thackur
Kokan Political News : आमदार वैभव नाईकांनी घेतला किरण सामंत यांचा खरपूस समाचार...

निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धी- १५ मे

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- २२ मे

नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ मे

नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत- २७ मे

मतदानाचा दिनांक- १० जून

मतदानाची वेळ- सकाळी आठ ते दुपारी चार

मतमोजणीचा दिनांक- १३ जून

एकूण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक- १८ जून

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com