Wreckage of the IAF Jaguar fighter aircraft seen near Churu district in Rajasthan after the crash; investigation underway by the Indian Air Force.  Sarkarnama
देश

Jaguar Crashes : राजस्थानात जॅग्वार विमान कोसळले; हवेतच स्फोट, स्थानिकांच्या माहितीमुळे गुढ वाढले...

IAF Jaguar Fighter Jet Crashes in Rajasthan : हवाई दलाचे जॅग्वार हे लढाई विमान कोसळल्याने पुन्हा एकदा या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Rajanand More

Details of the Crash Site in Churu District : राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावात बुधवारी जॅग्वार हे लढाऊ विमान कोसळले. विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबतचे गूढ वाढले आहे. या अपघातात पायलटसह दोघांचा मृत्यू झाला आहे. आकाश जोरदार स्फोट झाल्यानंतर विमान शेतात कोसळल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.  

हवाई दलाचे जॅग्वार हे लढाई विमान कोसळल्याने पुन्हा एकदा या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे विमान नेमके कोणत्या कारणांमुळे कोसळेल, याचा तपास सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी बचावपथके दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून विमानातील दोघांचे मृतदेह बाहर काढण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटवली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज आल्यानंतर विमान शेतात कोसळले. स्थानिकांनी विमानाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. एका झाडावर हे विमान कोसळले होते. ते झाड पूर्णपणे जळाले आहे. हा संपूर्ण भाग वाळंवटी आहे.

चुरूचे पोलिस अधिक्षक जय यादव यांनी सांगितले की, अपघात झालेले विमान हवाई दलाचे आहे. विमान झाडावर पडले आणि पेट घेतला. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कराची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

दरम्यान, मागील चार महिन्यांत जॅग्वार विमानाचे तीन अपघात झाले आहे. यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यांत अपघात झाला होता. त्यावेळी प्रशिक्षणासाठी या विमानांनी उड्डाण केले होते. पण काही वेळातच विमाने तांत्रिक दोषामुळे कोसळली होती. आज झालेला अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, हे तपासानंतर स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT