MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांचा फडणवीस सरकारलाही ठोसा; म्हणाले, अंडी 15 दिवसांची, मांसाहार...

Sanjay Gaikwad Raises Concern Over MLA Canteen Food Quality : आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाराला मारहाण करण्याच्या आपल्या कृतीचे समर्थन केले आहे
MLA Sanjay Gaikwad addresses the media, highlighting annual complaints about poor food quality in the MLA canteen and government inaction.
MLA Sanjay Gaikwad addresses the media, highlighting annual complaints about poor food quality in the MLA canteen and government inaction. Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात काय?

  • शिवसेना आमदार संजय गायकवाड आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण करून पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

  • गायकवाड यांनी 15 दिवसांचे अंडे, शिळं मांस, पाल-उंदीरयुक्त अन्नाचा दावा करत, आपली कृती आरोग्यासाठी 'प्रतिक्रिया' म्हणून योग्य ठरवली.

  • सरकारकडे बोट दाखवत त्यांनी कॅन्टीनविषयी हजारो तक्रारी असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी केली.

Allegations Against Government : आमदार निवासातील कॅन्टीमध्ये जेवणाच्या निकृष्ट दर्जामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले आहे. आपल्य वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणारे गायकवाड आता मारहाणीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. पण या प्रकरणावर गायकवाडांनी थेट आपल्याच सरकारकडे बोट दाखवले आहे.

आमदार गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून मी आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहे. तर साडे पाच वर्षांपासून येथे राहत आहे. कॅन्टीनमध्ये चांगले जेवण असावे, अशी विनंती मी त्यांना वारंवार केली आहे. पण अंडी 15 दिवसांची, मांसाहार 15-20 दिवसांचा, भाज्या 2-4 दिवसांच्या असतात, असा दावा गायकवाड यांनी केला.

दररोज सुमारे 5 ते 10 हजार लोक येथे जेवण करतात. प्रत्येकाची हीच तक्रार आहे. कधी जेवणात पाल तर कधी उंदीर असतो, असा धक्कादायक दावाही गायकवाडांनी केला. काल रात्री मी 10 वाजता जेवण मागवले होते. पहिला घास घेतल्यानंतर काहीतरी गडबड आहे, असे जाणवले. जेवणाचा वास घेतल्यानंतर ते अन्न शिळे असल्याचे लक्षात आले, अशी माहिती गायकवाडांनी दिली.

MLA Sanjay Gaikwad addresses the media, highlighting annual complaints about poor food quality in the MLA canteen and government inaction.
Nishikant Dubey Controversy : दुबेंचा डाव आधी समजून घ्या, ही गरळ उगाच नाही; महाराष्ट्राला डिवचण्याची ही आहेत 3 कारणे...

कॅन्टील चालकाला मी वारंवार समजावून सांगितले की, चांगले अन्न द्यावे, विषारी अन्न आरोग्यासाठी धोकादायक ठरेल. पण ते ऐकणार नसतील तर माजी समजावण्याची वेगळी पध्दत आहे, असे म्हणत गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.

सरकारकडे दाखवले बोट

कॅन्टीनमधील जेवणाबाबत दरवर्षी सरकारकडे हजारो तक्रारी येतात. पण त्याकडे का दुर्लक्ष केले जाते, मला माहित नाही. त्यांची चौकशी का केली जात नाही?, असा सवाल गायकवाडांनी केला. स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण असते. त्याच तपासणी व्हायला हवी. पण कुणालाही त्याची चिंता नाही. त्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळू नये. संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंतीही गायकवाड यांनी सरकारकडे केली.

MLA Sanjay Gaikwad addresses the media, highlighting annual complaints about poor food quality in the MLA canteen and government inaction.
Nishikant Dubey : रेस्टॉरंट, अनेक फ्लॅट, दुकान...एवढी मालमत्ता..! खासदार दुबेंनी ठाकरेंच्या नेत्याचा भ्रष्टाचार काढला...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: संजय गायकवाड कोणत्या कारणामुळे वादात सापडले आहेत?
    उत्तर: कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने.

  • प्रश्न: त्यांनी कोणता अन्नविषयक आरोप केला?
    उत्तर: शिळं अन्न, 15 दिवसांची अंडी, उंदीर व पाल असलेले अन्न दिले जात असल्याचा आरोप केला.

  • प्रश्न: गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन कसे केले?
    उत्तर: ते म्हणाले की, वारंवार समजावूनही सुधारणा न झाल्यास ‘वेगळी पद्धत’ वापरणे भाग आहे.

  • प्रश्न: त्यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
    उत्तर: दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कॅन्टीनची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com