IAS Transfer Sarkarnama
देश

IAS Transfer News : प्रशासनात फेरबदलाचे वारे! 24 दिग्गज अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश; वीर विक्रम यादव यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

IAS officer transfer : प्रशासनात मोठा फेरबदल जाहीर; 24 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. वीर विक्रम यादव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. संपूर्ण बातमी वाचा.

Rashmi Mane

प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आला असून केंद्र सरकारने वरिष्ठ पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विविध मंत्रालयांतील सुमारे 24 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात कॅबिनेट नियुक्ती समितीने या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे.

या फेरबदलामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी फैज अहमद किदवई यांची जागा घेतली असून विमान वाहतूक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली सुधारणा आणि कार्यक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

बिहार कॅडरचे अनुभवी अधिकारी चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या मंत्रालयाच्या धोरणात्मक कामकाजाची सूत्रे असतील. त्याचबरोबर निवेदिता शुक्ला वर्मा यांची प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पेन्शन विभागाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पंजाब कॅडरचे तेजवीर सिंह यांची रसायन आणि पेट्रो-केमिकल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. या क्षेत्रातील धोरणे आणि प्रकल्प राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत असलेले संजय जाजू यांची ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे, ज्यामुळे त्या भागातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

तसेच कर्नाटक कॅडरचे श्रीवत्स यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे नरेंद्र भूषण हे ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत भू-संसाधन विभागाचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. याशिवाय चंद्रशेखर कुमार यांची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पर्जन्यक्षेत्र प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT