महिलांनो सुवर्णसंधी सोडू नका! सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळणार थेट 24 लाख रुपये, नेमकी काय आहे योजना?

Women financial support scheme : महिलांसाठी मोठी संधी! सरकारच्या विशेष योजनेतून तब्बल 24 लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
महिलांनो सुवर्णसंधी सोडू नका! सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळणार थेट 24 लाख रुपये, नेमकी काय आहे योजना?
Published on
Updated on

महिलांनो राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही खास योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्यास मदत मिळणार आहे. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारनं एक महत्त्वाची पुढाकार घेतला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत आता गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या योजनेमुळे महिला बचत गटांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महिलांनो सुवर्णसंधी सोडू नका! सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळणार थेट 24 लाख रुपये, नेमकी काय आहे योजना?
Toll Price Hike: आजपासून राज्यातील हायवेचा प्रवास महागला, तुमच्या खिशाला लागणार मोठी कात्री! जाणून घ्या नवे दर

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळणार असून महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिला बचतगटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कमाल 24 लाख रुपयांपर्यंत मिळेल.

ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची गरज वाढत आहे. मात्र, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. ही अडचण लक्षात घेऊन या योजनेतून भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात आधुनिक साधनांचा वापर करता येईल.

कृषी अवजार बँकेच्या माध्यमातून पेरणी, लावणी, कापणी यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये लागणारी यंत्रे सहज मिळणार आहेत. यामुळे शेतीकाम अधिक जलद, सोपे आणि कार्यक्षम होईल. त्याचबरोबर महिला बचत गटांना या यंत्रांद्वारे भाडे उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल.

असा करा अर्ज...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना बँक खात्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. अधिकृत संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

महिलांनो सुवर्णसंधी सोडू नका! सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळणार थेट 24 लाख रुपये, नेमकी काय आहे योजना?
Kolhapur News : उध्वस्तरावांची शिल्लक सेना! जिल्ह्याच्या नेत्यानेच स्टेट्स झळकावला, अख्ख्या गावानं पाहिला अन् दोन मिनिटांत डिलीट  

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपण व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाईन हार्वेस्टर, फवारणी पंप यांसारखी आधुनिक कृषी साधने खरेदी करण्याची संधी दिली जाणार आहे. स्थानिक पिकांच्या गरजेनुसार यंत्रांची निवड करण्याची मुभाही देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com