Iran Latest News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती खुद्द ट्रम्प यांनाही असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणने आपली हत्या केली तर त्यांना पूर्णपणे नष्ट करा, असे आदेश ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांना दिले आहेत. ट्रम्प यांचे हे निर्देश म्हणजे इराणविरोधातील त्यांची टोकाची भूमिका स्पष्ट झाली आहे.
इराणवर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांनी मंगळवारी एका महत्वाच्या कार्यकारी आदेशावर सही केली. हा आदेश इराणसाठी अडचणीचा ठरणार आहे. आदेशानुसार इराणच्या तेल निर्यातीवर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांबाबतही निर्बंध आणले जाणार आहेत.
अमेरिकेच्या न्याय विभागाने राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप इराणवर केले होता. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. पण अमेरिकन सुरक्षा यंत्रणांकडून हा कट उधळून लावण्यात आला. फरहाद शकेरी या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावाही त्यावेळी करण्यात आला होता. तो इराणध्ये फरार आहे.
आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी हाच मुद्दा उकरून काढत इराणला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मंगळवारी हत्येबाबत विधान करून खळबळ उडवून दिली आहे. इराणने जर आपली हत्या केली तर त्यांना पूर्णपणे नष्ट करून टाका, असे निर्देश त्यांनी सल्लागारांना दिले आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांच्याकडून इतर काही देशांवरही आर्थिक निर्बंध लादले जात आहेत. काही देशांतून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर अतिरिक्त कर लादला जात आहे. बेकादेशीर नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवले जात असून त्यात भारतीयांचाही समावेश आहे. आज एक विमान भारतात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.