
West Bengal News : राजकारणात कधी कोणत्या नेत्याची लॉटरी लागेल आणि कधी कोणता नेता रसातळाला जाईल, हे सांगता येत नाही. अशीच स्थिती भाजपच्या एका बड्या नेत्याची झाली आहे. कधीकाळी भाजपमध्ये वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या या नेत्यावर स्मशानभूमीबाहेर भीक मागण्याची वेळ आली आहे. ‘बुलेट दा’ म्हणून हा नेता प्रसिध्द होता.
इंद्रजीत सिन्हा असे या नेत्याचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ स्मशानभूमीबाहेर त्यांचा भीक मागतानाचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आणि इतर नेत्यांची धावपळ सुरू झाली. सिन्हा यांच्यापर्यंत पोहचत त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. सुकांता मजूमदार यांनी भाजपच्या जिल्ह्याध्यक्षांना तातडीने कामाला लावले. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्हायरल फोटोची दखल घेत सिन्हा यांना कोलकाता येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रयत्न केले.
इंद्रजीत सिन्हा हे यापूर्वी भाजपचे पश्चिम बंगाल आरोग्य सेवा विभागाचे संयोजक होते. त्यांनी अडचणीच्या काळात भाजपचे अनेक कार्यकर्ते, समर्थकांना सरकारी रुग्णालयांत भरती करणे, तसेच आरोग्याशी संबंधित इतर कामांसाठी खूप मदत केली होती. आरोग्य क्षेत्रात भाजपचे काम वाढवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते संपूर्ण बंगालमध्ये प्रसिध्द झाले होते.
मागील दोन वर्षांपासून सिन्हा यांना कर्करोगाने ग्रासले आहे. उपचारांसाठी त्यांना रुग्णालायत भरतीही होता आले नाही. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याचीही चांगली व्यवस्था नव्हती. त्यांची स्थिती एवढी दयनीय झाली की, त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. 40 वर्षांचे सिन्हा अविवाहित असून आई-वडिलांचेही निधन झाले आहे. त्यांच्या घराचाही ठावठिकाणी नाही.
सिन्हा हे दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात भाजप सध्या प्रमुख विरोधी पक्ष आहे. पण आजारपणामुळे सिन्हा पक्षाच्या कामापासून दूर गेले. कुटुंबातही कुणी नसल्याने त्यांच्या प्रकृतीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आणि त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.