Israel-Hamas War  Sarkarnama
देश

Israel-Hamas War Impact : पॅलेस्टाईन-इस्राईल युद्धाचा परिणाम भारतावर; सोने-चांदीच्या दरात वाढ

Gold-Silver Rate News : आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर घसरत असताना शनिवारी पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर उसळले आहेत.

Vijaykumar Dudhale

Israel News : पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे इस्राईल देश हादरून गेला आहे. या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर येत्या काळात जाणवणार आहेत. अमेरिकेने हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक घडामोडींवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे. त्याचा काही अंशी परिणाम भारतावर झाला असून, शनिवारी (ता. ८ ऑक्टोबर) दिवसभरात सोने-चांदीच्या दरात एका दिवसातच मोठी वाढ झाली आहे. (Impact of Palestine-Israel war on India; Increase in gold-silver rates)

भारतात पितृपक्ष सुरू असल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दारावर झाले होते. आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर घसरत असताना शनिवारी पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर उसळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घसरत गेलेले सोने-चांदीचे भाव पुन्हा एकदा वधारले आहेत. शनिवारी चांदीच्या भावात १६०० रुपयांनी, तर सोन्याच्या भाव ३०० रुपयांनी वधारले आहेत. गेल्या आठवडाभरात सोन १४०० रुपयांनी, तर चांदी ४१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

इस्राईलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाच्या भीतीने सोन्या-चांदीचे दर अचानक वाढले आहेत. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होतो. त्यामुळे येत्या काळात इस्राईल व पॅलेस्टाईन या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेल्यास याचा परिणाम अनेक बाबींवर होणार आहे. त्यामुळे सध्या बाजरपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

दरम्यान, हमासने केलेल्या हल्ल्यात इस्राईलमधील १०० लोकांचा मृत्यू झाला असून, ३०० नागरिक जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल इस्राईलने केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील १९८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६१० नागरिक जखमी झाले आहेत.

इस्राईलमध्ये १८ हजार भारतीय नागरिक राहतात. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्राईलमधील भारतीय नागरिकांना दक्ष राहण्याचे सूचना भारतीय दूतावासाने दिल्या आहेत. दुसरीकडे अभिनेत्री नुसरत भरुचा इस्राईलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. नूसरतच्या टीममधील एका सदस्याने याबाबतची माहिती दिली आहे.

नूसरतसोबत शनिवारी दुपारपासून कोणताही संपर्क झालेला नाही. माध्यमांना माहिती देताना नूसरतच्या टीममधील सदस्याने सांगितलं की, नूसरत इस्राईलमध्ये अडकली आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यांच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. ज्यावेळी संपर्क झाला, तेव्हा ती एका तळघरात होती आणि सुरक्षित होती. त्यानंतर मात्र तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. नूसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आशा आहे सुरक्षित परतेल, असं तिच्या टीममधील सदस्याने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT