Congress- Bjp Politics :  Sarkarnama
देश

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये काँग्रेसला गळती; भाजपला चमत्काराची आशा

Congress- Bjp Politics : काँग्रेसचे दिग्गज नेते नाथुराम मिर्धा यांची नात व माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी सोमवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अनुराधा धावडे

Rajasthan News : नोव्हेंबर महिन्यात राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते नाथुराम मिर्धा यांची नात व माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी सोमवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे आगामी काळात भाजपला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः जाट समाजाचे प्राबल्य असलेल्या पट्ट्यात भाजपला चमत्काराची आशा असून, त्यांच्या प्रवेशामुळे या परिसरात किमान आठ ते नऊ विधानसभा जागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात प्रमुख लढत असलेले काँग्रेस व भाजपमध्ये कुरघोडी सुरू आहे. दोन्ही पक्ष राजकीय समीकरणे भक्कम करण्यात गुंतले असताना काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिर्धा यांना प्रवेश देत नागोर या लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप या जागेवर जाट समाजाच्या उमेदवाराच्या शोधात होते. मिर्धा यांच्या माध्यमातून चांगला चेहरा मिळाला असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

त्यांच्या प्रवेशामुळे नागौर लोकसभा मतदारसंघातील जाट समाजाचे प्राबल्य असलेले किमान आठ ते नऊ विधानसभा जागांवर होणार आहे. त्या ठिकाणी या घराण्याचा आजही प्रचंड धबधबा आहे. त्यामुळे मिर्धा याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजस्थानात काँग्रेसचा मोठा धक्का बसणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT