Sambhaji Bhide On Maratha : अंतरवाली सराटीतून राजकारण्यांना टोले अन् कौतुकही; काय म्हणाले संभाजी भिडे ?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकारण्यांच्या हातात म्हणजे शेवाळावरून चालण्यासारखे
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

Jalna Political News : राज्याचे राजकारण जालन्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. या छोट्याशा गावातून मुंबईतील हलचाली वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यातच अंतरवाली सराटीत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांची मंगळवारी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी भेट घेतली. एकीकडे लबाड, चालाख, फक्त अश्वासन देणे, असे राजकारण्यांना टोले लगावत भिडेंनी सत्ताधाऱ्यांचे कौतुकही केले. (Latest Political News)

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा एेरणीवर आला असतानाच इतर समाजांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्य सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. अशा वातावरणात मंगळवारी संभाजी भिडे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगेची भेटी घेतली. या वेळी भिडेंनी, जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. 'मी राजकारणी नाही. त्यांच्यासारखी लबाडी करणार नाही. आम्ही चलाखी, लबाडी करणारे नाहीत. तुमच्या लढ्याला यश मिळणार आहे, पण तुम्ही उपोषण मागे घ्यावे,' असे भिडे म्हणाले.

Sambhaji Bhide
Pusesavali News : पुसेसावळीला अस्वस्थ करणारा मास्टरमाईंड कोण? शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान...

संभाजी भिडे म्हणाले, 'राज्यातील मराठा आरक्षणासाठी तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. मात्र, जोपर्यंत हा प्रश्न राजकारण्यांच्या हातात आहे, तोपर्यंत शेवाळावरून चालण्यासारखे आहे. विरोधात असले की सर्वांना आरक्षण द्यायचे असते, पण सत्तेत आले की अडचणी येतात, यालाच राजकारण म्हणतात. आपण जिवाच्या आकांताने आंदोलन करत आहात. व्यवहार म्हणून मी तुम्हाला उपदेश करत नाही. मी राजकारणी नाही. तुम्ही करताय ते धर्माची समस्या आहे. तुमच्या तपश्चर्याला शंभर टक्के यश मिळेल,' असा विश्वासही भिडेंनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाचा तिढा सत्ताधाऱ्यांमुळेच चिघळल्याचा आरोप करताना दुसरीकडे भिडेंनी सत्ताधाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. भिडे म्हणाले, "राज्यात प्रत्येक गोष्टीचे राजकारण सुरू असले तरी आता सत्तेत बसलेले लोक चांगले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अजिबात लबाड नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेईमान नाहीत. ते कधीही लुच्चेपणा करणार नाहीत. राष्ट्रवादीचे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार काळजीवाहू आणि तत्पर माणूस आहेत. तुमचा आग्रह त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे काम मी करेन."

सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्याची विनंती भिडेंनी जरांगे पाटलांना केली आहे. "ही लढाई झट की पट आणि एक घाव दोन तुकडे अशी नाही. पण तुमचा आग्रह सत्य आहे. आपण मोठ्या मत्सेद्देपणाने हे उपोषण थांबवूयात. मी तुम्हाला नाउमेद करत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत तुमचा सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा आहे. माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे, की लढा सुरू ठेवा पण उपोषण थांबवा. जगात सगळेच खोटे बोलतात, पण आई मुलाशी खोटे बोलत नाही. जिजाऊ माउलींचा निरोप आहे, असे समजून तुम्ही मोठ्या कौतुकाने शिवरायांच्या पायाशी हात ठेवून आंदोलन थांबवावे, " असे आवाहन भिडेंनी जरांगे यांना केले.

(Edited by Sunil Dhumal)

Sambhaji Bhide
Dawood Ibrahim News : दाऊदच्या फरार नातेवाइकाला ३० वर्षांनंतर अटक; 'डी गँग'ची उलगडणार अनेक गुपितं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com