Manipur Violence News  Sarkarnama
देश

Manipur Violence News : मणिपूरमध्ये 'बुलेट प्रूफ' जॅकेटच्या विक्रीत वाढ; जीवाच्या भीतीने लोकांनीच घेतली खबरदारी!

Increase in sales of bullet proof jackets in Manipur : या जॅकेटची किंमत 3000 ते 3500 रुपये एवढी आहे, पण...

सरकारनामा ब्यूरो

Manipur News : भारताच्या ईशान्येतील मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून हिंसक कारवाया (Manipur Violence) सुरू आहेत. यामुळे मणिपूर संकटात आहे. आता मात्र राज्यातील स्थिती काही प्रमाणात सामान्य झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यात राज्यामध्ये बुलेटप्रूफ जॅकेटची यापूर्वी कधी विक्री होत नव्हती, मात्र आता बुलेटप्रूफ जॅकेटची विक्री आणि मागणी वाढलेली आहे. (Latest Marathi News)

मणिपूरमध्ये हिंसक कारवाया होण्याच्या भीतीतून लोक मोठ्या प्रमाणात बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेत आहेत. मणिपूरमधील एका दुकानदाराने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हंटले, "या आधी आम्ही कधीही बुलेट प्रूफ जॅकेट दुकानात विक्रीला ठेवत नव्हतो. पण मणिपूरमध्ये स्थिती सामान्य न राहिल्यामुळे आम्ही जॅकेटची विक्री सुरू केली. ही मागणी पहिल्यांदाच होत आहे. अनेक लोक जॅकेट खरेदी करायला येतात. (Increase in sales of bullet proof jackets in Manipur)

जॅकेटची किंमत किती आहे?

दुसऱ्या एका दुकानदाराने सांगितले, "लोक जॅकेट खरेदी करण्यासाठी येत आहेत. एका दिवसात आम्ही 30 पेक्षा अधिक जॅकेटची विक्री करत आहोत. या जॅकेटची किंमत 3000 ते 3500 रुपये एवढी आहे. पण जॅकेटची ऑर्डर अधिक असेल तर 3000 रुपयांपेक्षा कमी किंमत लावून आम्ही विकतो."

संरक्षणासाठी जॅकेट खरेदी :

मणिपूरमधील एका स्थानिक नागरिकाने म्हंटले की, "जेव्हा ही आम्हाला हिंसाचार आणि तणाव असलेल्या भागात जाण्याची आवश्यकता भासते, तेव्हा आमचं संरक्षण हे बुलेट प्रूफ जॅकेट करते. आम्ही खूप दूरवर राहण्यासाठी आहोत, मध्ये प्रवासात कधी आपत्ती ओढवली तर हे जॅकेट आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT