Rahul Gandhi at Red Fort Sarkarnama
देश

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर; राहुल गांधींच्या जागेवरून वादाची ठिणगी

Independence Day Red Fort Leader of Opposition : दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Rajanand More

New Delhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरूवारी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात मागील दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. राहुल गांधी पहिले नेते ठरले आहेत. दरम्यान, त्यांच्या जागेवरून चर्चांना उधाण आले असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्याच कार्यक्रमात अनोखा अंदाज पाहायला मिळाले. ते त्यांच्यासाठीच्या ऱाखीव खुर्चीवर न बसता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलेल्या खेळाडूंसोबत शेवटून दुसऱ्या रांगेत बसले होते. मनू भाकर, सरबज्योत सिंग, पीआर श्रीजेश आदी खेळाडू यांच्या शेजारी दिसले. हॉकी टीममधील इतर खेळाडूनही यावेळी उपस्थित होते.

नेहमी टी-शर्टमध्ये दिसणारे राहुल गुरूवारी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालून कार्यक्रमाला आले होते. विरोधी पक्षनेते झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिल्या स्वातंत्र्य दिन असल्याने त्यांच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यांनी पहिल्याच कार्यक्रमात खेळाडूंसोबत बसत सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले.

दरम्यान, लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा 2014 ते 2024 पर्यंत रिक्त होते. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नसल्याने हे पद रिक्त होते. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले. त्यामुळे २५ जून रोजी राहुल गांधी यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करण्यात आले. 

राहुल यांच्या जागेवरून वाद

प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेते हे पहिल्या रांगत बसणे अपेक्षित आहे. पण राहुल गांधी शेवटून दुसऱ्या रांगेत ऑलिम्पिक खेळाडूंसोबत बसल्याने सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पहिल्या रांगेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दिसत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही पहिल्या रांगेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT