Indian air defence units successfully intercepted aerial threats aimed at Amritsar's Golden Temple, foiling Pakistan’s suspected plans.  Sarkarnama
देश

Indian Army : 'पाक'च्या निशाण्यावर होते गोल्डन टेम्पल; धक्कादायक माहिती समोर, भारताने असा केला मुकाबला

Pakistan Army’s Alleged Plan to Target Golden Temple : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकने अमृतसरमधील गोल्डन टेम्पल टार्गेट केले होते. तसेच पंजाबमधील इतर काही शहरांवरही मिसाईल डागले होते.

Rajanand More

How Indian Air Defence Intercepted the Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याबरोबरच पाकच्या लष्करालाही पाणी पाजले. ड्रोन, मिसाईलद्वारे पाकने केलेले सर्व हल्ले भारताने परतवून लावले. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाक सैन्याच्या निशाण्यावर अमृतसरमधील गोल्डन टेम्पलही होते. मात्र, भारतीय सैन्याने हा प्लॅन नेस्तनाबूत केला.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकने अमृतसरमधील गोल्डन टेम्पल टार्गेट केले होते. तसेच पंजाबमधील इतर काही शहरांवरही मिसाईल डागले होते. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये ही मिसाईल हवेतच निकामी केली. 15 व्या इन्फेन्ट्री डिव्हीजनचे जनरल ऑफिरसर कमांडिंग मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी सोमवारी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केले आहे.

पाकने गोल्डन टेम्पलच्या दिशेने सोडलेले सर्व ड्रोन आणि मिसाईल भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स गनर्सने पाडल्याची माहिती शेषाद्री यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, पाक सैन्याकडे दुसरे कोणतेही मोठे टार्गेट नाही, हे माहिती होते. त्यामुळे भारतीय लष्कराची प्रमुख ठिकाणे, धार्मिक स्थळांना पाककडून प्रामुख्याने लक्ष्य केले जाईल, असा अंदाज आम्हाला आधीच होता.

पाकिस्तानने हल्ला करण्याआधीच आम्ही गोल्डन टेम्पलभोवती एअर डिफेन्स कवच उभारण्यासाठी अतिरिक्त आधुनिक हत्यारे एकत्रित केली होती. पाकने 8 मेला पहाटे ड्रोन आणि मिसाईलद्वारे हवाई हल्ला केला. या हल्ल्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज होतो. आपल्या सतर्क एअर डिफेन्स गनर्सने पाकचे मनसुबे उधळून लावले. त्यांचे ड्रोन, मिसाईल हवेतच निकामी करत गोल्डन टेम्पलवर एक ओरखडाही येऊ दिला नाही, असे शेषाद्री म्हणाले.

पाकिस्तानी लष्कराकडे भारतावर हल्ला करण्यासाठी कोणतेही निश्चित टार्गेट नाही. त्यांच्याकडे भारतीय सैन्याचा मुकाबला करण्याचे धाडस आणि क्षमताही नाही. भारतीय लष्कर एक जबाबदार सैन्यदल आहे. लष्कराने नेहमीच संयमाने प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्यक केले होते, हे पाकिस्तानी सैन्यानेही मान्य केल्याचे शेषाद्री म्हणाले.

दरम्यान, भारतीय लष्कराने सोमवारी आकाश मिसाईल सिस्टीम, एल-70 एअर डिफेन्स गन आणि भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमचा डेमो दाखवला. या यंत्रणेने कशापध्दतीने गोल्डन टेम्पल आणि पंजाबमधील इतर शहरांचा पाकच्या मिसाईलपासून वाचवले, याची माहिती यावेळी देण्यात आली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT